Pune Crime News | फ्लॅट भाडयाने घेण्याच्या बहाण्यानं 53 वर्षीय महिलेची 1.64 लाखाची फसवणूक

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षित व्यक्तीच सायबर चोरट्यांच्या भूल-थापणा बळी पडत असून, येरवडा परिसरात फ्लॅट भाड्याने घ्यायचा असल्याचे सांगत एका महिलेला 1 लाख 64 हजार रुपये भरण्यास भाग पडल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी 53 वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती व बँक खाते धारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्यानीनगर येथे राहतात. त्यांचा रहटणी येथे एक फ्लॅट आहे. तो सध्या मोकळा असल्याने त्यांना हा फ्लॅट भाड्याने द्यायचा आहे. यासाठी त्यांनी याबाबत काही अ‍ॅपवर पोस्ट केल्या होत्या. त्यावेळी एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला व त्याने मी लष्करात नोकरीस आहे. मला तुमचा फ्लॅट भाड्याने करायचा आहे. मला रेंट आणि डिपॉझिट मान्य आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांना रक्कम फोन पे व पेटीएमद्वारे पाठवण्यासाठी त्यांना एक क्युआरकोड पाठवून तो स्कॅन करण्यास सांगितले. त्यांनी तो स्कॅन केल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मुलाच्या खात्यातून एकूण 1 लाख 64 हजार रुपये ट्रान्स्फर करून घेत त्यांची फसवणूक केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक वाघमारे हे करत आहेत.

हे देखील वाचा

Pune Crime News | टिळक रस्त्यावरील लॅपटॉप विक्रेत्याला15 लाख रुपयांना गंडा

Maharashtra Strict Restriction | डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता

सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुखांचा थेट संबंध नाही; उच्च न्यायालयात युक्तिवाद

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime News | cheating of 1.64 lakh of 53-year-old woman by pretext of renting flat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update