Pune Crime News | टिळक रस्त्यावरील लॅपटॉप विक्रेत्याला15 लाख रुपयांना गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – pune crime news |टिळक रस्त्यावरील एका लॅपटॉप विक्रेत्याला स्वस्तात लॅपटॉप घेऊन देण्याच्या आमिषाने 15 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. गंडा घालणारा देखील लॅपटॉप विक्रेता आहे. मार्च ते जून 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

याप्रकरणी केतन सुनील पळसकर (वय 36, नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार भरत लिलेश कुमार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे टिळक रस्त्यावर लॅपटॉप विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. तर भरत याचेही या परिसरात ऑफिस प्लस दुकान आहे. या दोघांची ओळख आहे. भरतने फिर्यादी यांना एकाचवेळी 100 लॅपटॉप खरेदी केले तर ते स्वस्तात मिळतील असे सांगत विश्वास संपादन केला. लॅपटॉप मुंबई येथून घेऊ असे सांगितले. फिर्यादी भरत याला ओळखत असल्याने फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे त्यांनी त्याला खरेदी करण्यास होकार दिला.

प्रथम 5 लाख व नंतर 10 लाख रुपये दिले. पैसे आरटीजीएसने दिले होते. पैसे दिल्यानंतर दोन दिवसात लॅपटॉप मिळतील असे, त्यांना सांगण्यात आले होते. मात्र पैसे देऊनही काही दिवस झाले तरी लॅपटॉप मिळाले नाहीत. एक ते दीड महिना झाल्यानंतर फिर्यादी यांनी त्याला विचारपूस केली असता तो टाळाटाळ करू लागला. तर नंतर त्याने फोन उचलणे देखील बंद केले. यामुळे फिर्यादी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. अधिक तपास उपनिरीक्षक सरडे हे करत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : pune crime news | cheating of 15 lakh of Laptop seller on Tilak Road

हे देखील वाचा

COVID-19 vaccine tips | सर्दी, खोकला, तापासारख्या कोरोनाच्या लक्षणांनी पीडित लोक लस घेऊ शकतात का?

सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुखांचा थेट संबंध नाही; उच्च न्यायालयात युक्तिवाद

Panchavati Express | खूशखबर ! मुंबई- नाशिक धावणारी ‘पंचवटी’ अन् ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेस उद्यापासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

Bank Holidays in July 2021 । जुलैमध्ये एकूण 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्टयांची यादी