पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाविद्यालयीन तरुणांमध्ये बुधवारी सकाळी सेंट्रल मॉलजवळ (Central Mall Pune) तुंबळ हाणामारी (Tumbal Hanamari) झाली. त्यात २२ वर्षांचे दोन महाविद्यालयीन तरुण जखमी झाले आहेत.
दोन गटांमध्ये तरुणीशी बोलण्यावरुन वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात ७ ते ८ जणांच्या टोळक्याने दोघांवर कोयत्याने वार (Koyta Attack) केले. (Attempt To Murder)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीशी संबंधित हा वाद आहे. दोघे जण सेंट्रल मॉलजवळ उभे असताना ७ ते ८ जण तेथे आले. त्यांनी त्यातील एकाला चावीने मारले. त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले़ त्याच्याकडे दुचाकीची चावी नसल्याने तो तेथेच थांबून राहिला़ त्यामुळे या टोळक्यांमधील एकाने कोयता काढून त्याच्या डोक्यावर वार केले. त्याच्या मित्रावरही कोयत्याने वार केले. दोघांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर (Sr PI Girisha Nimbalkar) यांनी रुग्णालयात जाऊन जखमी तरुणाची भेट घेतली. या प्रकरणी तरुणाचे जबाब घेण्याचे काम सुरु असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे गिरीशा निंबाळकर यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#