Pune Crime News | WhatsApp ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण, पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढून टाकल्याच्या रागातून एका कामगाराने ‘इन्स्टा गो प्रा. लि.’ (Insta Go Pvt. Ltd.) कंपनीच्या अधिकाऱ्याला ऑफिसमध्ये जाऊन लाकडी बांबूने बेदम मारहाण (Beating) करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या कामगारावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार चंदननगर येथील जुना मुंढवा रोडवरील कंपनीच्या ऑफिसमध्ये 1 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा ते एक या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत इन्स्टा गो प्रा. लि. कंपनीचे अमोल शेषराव ढोबळे Amol Seshrao Dhoble (वय -31 रा. खांदवे नगर, लोहगाव, पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) बुधवारी (दि.6) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कंपनीत काम करणारा कामगार सत्यम शिंगवी याच्यावर आयपीसी 324, 504, 506, 427 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची इन्स्टा गो प्रा. लि. नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये आरोपी शिंगवी
हा काम करत होता. त्याच्या विरोधात ग्राहकांच्या अनेक तक्रारी येत होत्या. यामुळे फिर्यादी ढोबळे यांनी त्याची समजूत काढली होती. मात्र, आरोपीच्या विरोधात वारंवार तक्रारी येत असल्याने ढोबळे यांनी त्याला फोन केला. मात्र, त्याने फोन उचलला नाही.

यामुळे ढोबळे यांनी शिंगवी याला कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढून टाकले.
याचा राग आल्याने शिंगवी याने ऑफिसमध्ये येऊन ढोबळे यांना ‘तु मला ग्रुप मधून का काढले? तू बाहेर ये तुझ्याकडे बघतो’
अशी धमकी दिली. त्यानंतर लाकडी बांबू घेऊन तो ढोबळे यांच्या ऑफिसमध्ये गेला.
त्याठिकाणी ढोबळे यांना लाकडी बांबूने मारहाण करुन त्यांचा आयफोन तोडून नुकसान केले.
पुढील तपास चंदननगर पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बँकॉक-थायलंड ट्रीपच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक, पुण्यातील प्रकार

Pune Police MPDA Action | विश्रांतवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 64 वी स्थानबध्दतेची कारवाई