Pune Crime News | मधुचंद्रासाठी मालदीवला नेले पण…, पत्नीची पतीसह सासरच्या मंडळी विरोधात फसवणुकीची तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्नानंतर पतीने मधुचंद्रासाठी मालदीवला (Maldives) नेले मात्र पतीने शरीरसंबंध ठेवले नाहीत. एवढेच नाही तर, त्यासाठी सक्षम नसल्याचे लक्षात आल्यानंतर उच्चशिक्षित पत्नीने पोलिसांकडे धाव घेत पतीसह सासू सासऱ्यांविरोधात फसवणूक (Cheating) आणि छळवणूकीची तक्रार दाखल (Pune Crime News) केली आहे. त्यानुसार चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता बी.टेक. (B. Tech.) आणि एम.बी.ए (M.B.A) असून ती एका बड्या कंपनीत नोकरी (Job) करते. तर तिचा पती अभियंता (Engineer) असून तो देखील एका कंपनीत नोकरीला आहे. दोघांचा एप्रिल 2022 मध्ये विवाह झाला होता. यानंतर ते मधुचंद्रासाठी (Honeymoon) मालदीवला गेले होते. परंतु, त्यांच्यामध्ये पती-पत्नीप्रमाणे कोणतेच संबंध आले नाहीत. त्यानंतर पती सातत्याने संबंध ठेवण्यासाठी टाळाटाळ करत होता.

 

बेडरुममध्ये पती-पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी झोपत होते.
जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता ‘दम कोंडल्यासारखे होते’ असे म्हणून पती लांब झोपत असे.
त्यानंतर पती आणि सासू सासऱ्यांनी मारहाण करुन पीडीतेला माहेरी सोडले होते.
तरीही समझोता करून ती पुन्हा सासरी आली.
मात्र, पती शरीरसंबंध ठेवण्यास अपात्र असल्याचे लक्षात आल्यावर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

 

Web Title :- Pune Crime News | Complaint of cheating by wife against husband and in-laws

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | शनिवारी परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत होणार महारोजगार मेळावा, विवाह संस्कार मेळावा

Chinchwad Bypoll Election | ‘मला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यश पाहिजे’; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावले

Aurangabad Crime | बापाच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागून पोटच्या मुलांनीच केली बापाची हत्या