Pune Crime News | एटीएममधून पैसे न आल्याने गुगलवरुन केला संपर्क; सायबर चोरट्याने केले बँक खाते रिकामे

पुणे : Pune Crime News | एटीएममधून पैसे न आल्याने गुगलवरुन सर्च करुन बँकेचा नंबरवर संपर्क साधला. तो निघाला सायबर चोरट्याचा नंबर. सायबर चोरट्याने ऑनलाईन २ लाख रुपये काढून घेऊन बँक खाते रिकामे केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी विश्रांतवाडी येथील एका ५५ वर्षाच्या नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१/२३) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी कार्ड टाकल्यानंतरही पैसे न आल्याने त्यांनी गुगलवरुन नंबर घेतला. तो बँकेच्या नावाने सायबर चोरट्यांनी टाकलेला हेल्पलाईन नंबर होता. (Pune Crime News)

त्यावर संपर्क साधल्यावर मोबाईलधारकाने आपण बँकेचा अधिकारी असल्याचे भासवले.
त्याने फिर्यादीला एनीडेक्स हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्याप्रमाणे त्यांनी ते डाऊनलोड केल्यावर त्यांच्या मोबाईलचा ताबा सायबर चोरट्याने घेऊन त्यांच्या एस बी आय बँक खात्यावरुन ऑनलाईन पद्धतीने २ लाख रुपयांचे व्यवहार करुन फसवणूक केली.
त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) तक्रार अर्ज दिला होता.
त्याच्या चौकशी नंतर आता विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत. (Pune Cyber Crime)

Web Title :-Pune Crime News | Contacted from Google as money did not come from ATM; Bank account emptied by cyber thief

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rapido Bike Taxi | ‘रॅपिडो’ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, बाईक, टॅक्सीसह सर्व सेवा बंद करण्याचे आदेश; रिक्षाचालकांना मोठा दिलासा

Maharashtra Government | एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! शिंदे-फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय