Pune Crime News | रस्ता चुकल्याने कंटेनरचालकाने दुसर्‍याचा रॉडने मारुन केला खून; दोन दिवस लागलाच नाही पत्ता, लोणीकंदमधील घटना

पुणे : Pune Crime News | सोलापूर रोडवरुन चाकणला जात असताना रस्ता चुकल्याने दोन कंटेनरचालकांमध्ये झालेल्या वादातून एका चालकाने गळा दाबून लोखंडी रॉडने मारहाण (Beating) करुन दुसर्‍याचा खून (Murder In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. तुळापूर ते लोणीकंद रोडवरील (Tulapur to Lonikand Road) हॉटेल सिताईचे समोर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरमध्ये दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता. रस्त्याच्या कडेला कंटेनर का थांबलेला हे पाहिल्यावर दोन दिवसांनी खूनाचा हा प्रकार उघडकीस आला आहे. लोणीकंद पोलिसांनी ट्रकचालकाला अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

शहजाद अब्दुलक्युम अहमद (वय २६, रा. पोखर भिटवा पो. बिशुनपुरवा, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. तर, शमशुल अलीअहमद खान (वय २६, रा. चायकला, थाना दुधारा, जि. खल्लाबाद, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे.

याबाबत संजय रामफल कालीरामना (वय ४१, रा. वलसाड, गुजरात) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८७/२३) दिली आहे. हा प्रकार तुळापूर ते लोणीकंद रोडवरील सिताईचे समोर २६ जानेवारी सायंकाळी ५ वाजता घडला होता. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडु धर्मपुरी येथून माल घेऊन एक कंटेनर चाकणला येत होता. सोलापूर रोडवरुन चाकणसाठी ते वळल्यानंतर एका ठिकाणी त्यांना बॅरिकेट लावलेले दिसले. त्यामुळे ते रस्ता चुकून दुसरीकडे गेले. तुळापूर येथे गेल्यावर त्यांना रस्ता चुकल्याचे लक्षात आले. रस्ता चुकल्याने लांबचे वळण घ्यावे लागणार, त्यामुळे जादा खर्च आला, यावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला. त्यात खान याने अहमद याला मारहाण केली. त्याचा गळा दाबला. तेथेच असलेल्या लोखंडी रॉड त्याच्या डोक्यात मारला. त्यामुळे अहमद हा निपचित पडला.

अहमदचा मृत्यु झाल्याचे लक्षात आल्यावर खान याने त्याचा मृतदेह कंटेनरच्या केबिनमध्ये ठेवून तो पळून गेला.
रस्त्याच्या कडेला कंटेनर इतके दिवस का थांबला, हे पाहिल्यावर त्यात मृतदेह आढळून आला.
लोणीकंद पोलिसांनी त्या कंटेनरच्या मालकाशी संपर्क साधला.
तेव्हा त्यांनी दोन चालक असल्याचे सांगून दोघांची नावे, नंबर दिला.
त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करुन दुसर्‍या कंटेनर चालकाला ताब्यात घेतले.
तेव्हा त्याने अहमद याने आपल्याला वाटेत उतरुन दिले. त्यानंतर तो पुढे निघून गेल्याचे सांगितले.
तेव्हा पोलिसांनी सोलापूर रोडवरील सर्व टोलनाक्यावरील सीसीटीव्ही तपासले.
त्यात खान हा कंटेनरमध्येच असल्याचे दिसून आल्याने पुन्हा त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबुल केला.
सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Web Title :-Pune Crime News | Container driver kills another with a rod after missing the road; It didn’t take two days for the address, the incident in Lonikand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrapur Accident | चंद्रपूरमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसचा भीषण अपघात; 2 ठार, 17 जखमी

Dilip Malkhede Passed Away | अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांचे पुण्यात निधन