पुणे (नितीन पाटील) –
Pune Crime News | कॉसमॉस बँकेचे (Cosmos Bank) सलग 43 वर्ष संचालक असणारे 86 वर्षीय डायरेक्टर मुकूंद लक्ष्मण अभ्यंकर Mukund Laxman Abhyankar (रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर – Model Colony, Shivaji Nagar) यांना भरधाव वेगात चारचाकी चालवून दुचाकीस्वार महिलेस धडक देवून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.के. दुगांवकर (Judge S.K. Dugaonkar)यांनी हा निर्णय दिला आहे. दरम्यान, दंडाची रक्कम न भरल्यास 1 महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असे न्यायालयाच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. (Pune Crime News)
डेक्कन पोलिस स्टेशनच्या (Deccan Police Station) हद्दीतील भांडारकर रस्त्यावरील (Bhandarkar Road) अभ्युदय बँकेसमोर दि. 17 जुलै 2016 रोजी दुपारच्या सुमारास मुकूंद अभ्यंकर यांनी चारचाकी चालवित असताना अरूंधती गिरीश हसबनीस Arundhati Girish Hasabnis (29, रा. नर्हे) यांना जबर ठोस दिली होती. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अरूंधती यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी विक्रम सुशिल धूत Vikram Sushil Dhoot (35, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली होती. (Pune Crime News)
त्यावेळी हे अपघात प्रकरण प्रचंड गाजले होते. अभ्यंकर यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. दरम्यान, सरकार पक्षाच्या वतीने अॅड. गिरीश बारगजे (Adv Girish Barguje) यांनी खटल्याचे काम पाहिले तर बचाव पक्षाच्या वतीने अॅड. ऋषिकेश गानू (Adv Rishikesh R Ganu) यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, न्यायालयाने अभ्यंकर यांना शिक्षा सुनावली आहे. अलीप करण्यासाठी अभ्यंकर यांना न्यायालयाने मुभा दिली आहे. सध्या अभ्यंकर यांनी अपिल करण्यासाठी जामिन घेतला आहे.
डेक्कन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस (Sr PI Vipin Hasabnis),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) शकील पठाण (PI Shakil Pathan) यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक खानेकर, पोलिस हवालदार काकडे,
पोलिस नाईक भुवड आणि पोलिस नाईक मोरे यांनी खटल्याचे कामकाज पाहिले
Web Title : Pune Crime News | Cosmos Bank director Mukund Abhyankar gets 6 months jail
for killing woman in road accident
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- BJP MLA Nitesh Rane | नितेश राणेंच्या ‘त्या’ टीकेला वैभव नाईकांचं प्रत्युत्तर, म्हणाले-‘ आमदार गेले तरी…’
- Demarcation Of Parliament House | लोकसभेच्या जागा वाढवण्याचा होतोय विचार;
मात्र नवीन संसदेची आसनक्षमता पडतीये कमी - MPSC Action On Nayab Tahsildar | Pune : नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या अनिल पाटील आणि जयश्री नाईक यांच्यावर MPSC कडून मोठी कारवाई