Pune Crime News | वन कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या दोघांना न्यायलयाकडून शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | राखीव वनात दुचाकी घेऊन गेल्या दोघांना वनरक्षकांनी (Forest Guards) हटकले. याचा राग आल्याने दोघांनी वनरक्षकास शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी (Pune Crime News) अतिरिक्त जिल्हा आणि सत्र (Additional District and Sessions) न्यायाधीश ए.आय. पेरमपल्ली (Judge A.I. Perampalli) यांनी मारहाण करणाऱ्या दोघांना तीन महिने कारावास (Imprisonment) आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

 

चांगदेव गणपत शिंदे (वय-38) आणि रामदास धारु शिंदे (वय-38 रा. शिंदेवाडी, मलठण, शिरुर) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. यासदंर्भात तत्कालीन वनरक्षक रईस रहेमान मोमिन Rais Rahman Momin (वय-25 रा. शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात (Shirur Police Station) फिर्याद दिली होती. मलठण गावाच्या हद्दीतील राखीव वनात 19 मार्च 2017 रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली होती. (Pune Crime News)

 

सरकारी वकील प्रदीप गेहलोत (Public Prosecutor Pradeep Gehlot) यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले.
तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक के.डी. थोरात (API K.D. Thorat) आणि पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत (Police Inspector Suresh Kumar Raut)
यांनी या गुन्ह्याचा तपास केला. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील (API Arjun Ghode-Patil),
सहायक पोलीस फौजदार विद्याधर निचीत आणि पोलीस हवालदार रेणुका भिसे यांनी कोर्टाच्या कामात मदत केली.

 

Web Title :- Pune Crime News | court gave two people imprisonment in case of assault on forest personnel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Chinchwad Crime | हातात कोयते घेऊन टोळक्याचा राडा, पिंपरीतील बौद्धनगर मधील घटना; 9 जणांवर FIR

CM Eknath Shinde | राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहकारी संस्था केंद्र सरकारच्या रडारवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

Manoj Bajpayee | राम गोपाल वर्मा यांच्या स्वभावाबाबत मनोज बाजपेयींनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले “तो स्वतःच्या मनाचा राजा…”

Chhatrapati Sambhaji Nagar Accident | एसटी आणि गॅस सिलेडर घेऊन जाणाऱ्या टेम्पोमध्ये भीषण अपघात, 10 जणांची प्रकृती चिंताजनक; टेम्पो चालकाचा मृत्यू