Pune Crime News | ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मुंढवा येथील ‘बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बार’वर गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत रात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण (Noise Pollution) करणाऱ्या मुंढवा येथील ‘बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट ॲण्ड बार’वर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाकडून (SS Cell) कारवाई करण्यात आली. ही कारवाई रविवारी (दि.26) करण्यात आली असून या कारवाईत (Pune Crime News) पोलिसांनी 3 लाख 30 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम, डीजे मिक्सर जप्त केले आहे.

सामाजिक सुरक्षा विभागातील अधिकारी कर्मचारी रविवारी पेट्रोलींग असताना रात्री दहा वाजल्यानंतरही मुंढवा येथील ‘बॉटल फॉरेस्ट रेस्टॉरंट ॲण्ड बार’ (Bottle Forest Restaurant and Bar) येथे मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याचे आढळून आले. पथकाने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता नियमांचे उल्लंघन करुन साऊंड सिस्टीम सुरु होते. पोलिसांनी 3 लाख 30 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त केले. तसेच या हॉटेलच्या मालक आणि मॅनेजरवर पर्यावरण कायदा 1986 अंतर्गत ध्वनी प्रदूषण अधिनियमांतर्गत (Environment Protection Act) मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote), पोलीस अंमलदार अजय राणे, संदीप कोळगे,
अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | Crime branch action against ‘Bottle Forest Restaurant and Bar’ in Mundhwa causing noise pollution

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik ACB Trap | 40 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचा लिपिक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | विमानाने पुण्यात येऊन महागडे फोन चोरणारी आंतरराज्यीय टोळी विमानतळ पोलिसांकडून गजाआड, 30 लाखांचे मोबाईल जप्त

Aaditya Thackeray | सहा महिन्यात बारावे कारण दिलंय, तरीही ते गद्दारच!, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला