Pune Crime News | कोयते घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोयते घेऊन फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला Pune Crime News गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक Arrest केली आहे. तर त्याच्या एकट्याकडून 5 कोयते जप्त केले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

OSHO Ashram Land | कोरोनाचा फटका बसल्याने ओशो आश्रमाची पुण्यातील जमीन विक्रीला; भक्तांचा मात्र विरोध

प्रशांत विश्वास डोंगरे Prashant Vishwas Dongre (वय 19, रा. पांडवनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी चतु: श्रृगी पोलीस Chaturshrigi Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pan Card and Aadhaar Card | 30 जूनपूर्वी ‘हे’ काम करणे अनिवार्य अन्यथा बसेल 1 हजाराचा फटका

शहरात पहिले आरोपी व सराईत गुन्हेगार यांची माहिती काढून त्याना जेरबंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी सचिन जाधव व दत्ता सोनवणे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत डोंगरे हा विटकर बंगालो पांडवनगर येथे उभा असून, त्याच्याकडे घातक हत्यारे आहेत.
तो काही तरी गुन्हा Crime करण्याच्या तयारीत आहे.
त्यानुसार पथकाने याठिकाणी सापळा रचून त्याला अटक केली.
त्याच्याकडून 54 हजारांचे 5 कोयते जप्त केले आहेत.

Ajit Pawar | ‘…तर पुणे, जिल्ह्यातून बाहेर गेलेल्यांना परतल्यास 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल’ – उपमुख्यमंत्री (व्हिडीओ)

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे,
सहाय्यक आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भरत जाधव,
उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, सचिन जाधव, दत्ता सोनवणे, अशोक माने,
शशिकांत दरेकर, विजयसिंग वसावे, अय्याज दद्दीकर व महेश बामगुडे यांच्या पथकाने केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Pune Crime News Crime Branch arrested a criminal 

हे देखील वाचा

Break The Chain | मुंबई लोकल सेवेबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची महत्वाची माहिती, म्हणाले…

Dog instructor | राज्यातील पहिल्या महिला डॉग इन्स्ट्रक्टर सुप्रिया किंद्रे यांचा सत्कार

PM Narendra Modi । पीएम मोदींनी बोलावली जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कलम 370 नंतर आता कोणता निर्णय ?