Pune Crime News | माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | माथाडी संघटनेच्या (Mathadi Organization) नावाखाली खंडणी मागणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनच्या (Anti Extortion Cell) पथकाने सापळा रचून अटक (Arrest) केली. ही कारवाई गुरुवारी (दि.26) करण्यात आली. आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे 1 लाख 26 हजार रुपयांची खंडणी मागितली होती. तडजोडी अंती 26 हजार रुपये घेताना आरोपींना बेड्या (Pune Crime News) ठोकल्या आहेत.

संकेत दिलीप गवळी (वय 29 रा. सुखवाणी रॉयल, विमाननगर, पुणे), अरुण शंकर बोदडे (वय-48 रा. भैरव नगर, धानोरी रोड, पुणे), नितीन एकनाथ कांबळे (रा. लोहगाव, पुणे) यांच्यावर विमाननगर पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) आयपीसी 386, 387, 341, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन संकेत गवळी आणि अरुण बोदडे यांना अटक केली आहे. हा प्रकार 12 ऑगस्ट 2022 पासून 25 जानेवारी 2023 या दरम्यान घडला आहे. याबाबत तक्रारदार यांनी 24 जानेवारी रोजी खंडणी विरोधी पथक दोनकडे तक्रार अर्ज दिला होता. (Pune Crime News)

विमाननगर भागातील ॲरो मॉलमधील (Arrow Mall) साहित्य उचलण्याचे काम एका व्यावसायिकाकडे देण्यात आले होते. आरोपींनी संगणमत करुन फिर्यादी यांना साहित्य उचलू न देता गाड्यांची अडवणूक केली. तसेच कोणतीही वर्क ऑर्डर नसताना, नोंदणीकृत माथाडी कामगार नसताना, फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन 1 लाख 26 हजार रुपयांची खंडणी मागितली.

याबाबत व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिल्यानंतर खंडणी विरोधी पथकाने दोन पथके तयार केली. आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे तडजोड करुन 26 हजार रुपयांची खंडणी मागितली. तक्ररादर यांच्याकडून खंडणीची रक्कम घेताना आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Police Inspector Pratap Mankar),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajgane),
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Srikant Chavan), मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav)
पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रतदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव,
सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेदन आपटे, अनिल मेंगडे, पवन भोसले, आशा कोळेकर यांनी केली.

Web Title :- Pune Crime News | Crime branch arrested two people who demanded extortion in the name of Mathadi organization

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

Jannat Zubair Rahmani | जन्नत जुबेरचा स्टायलिश लूक; मात्र लूकपेक्षा ‘या’ व्यक्तीने वेधले सर्वांचे लक्ष