Pune Crime News | पुण्यात चरसची विक्री करणासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात अंमली पदार्थीची विक्री करण्यासाठी अहमदनगर येथून आलेल्या आणि एक वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक -2 ने (Anti Narcotics Cell) अटक केली आहे. त्याच्याकडून 24 लाखांचे दोन किलो चरस (Hashish) आणि इतर साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई (Pune Crime News) शुक्रवारी (दि.3) उरुळी कांचन येथे करण्यात आली.

 

औरंगजेब पप्पू अन्सारी उर्फ रंगा परदेशी Aurangzeb Pappu Ansari alias Ranga Pardeshi (वय-27 रा. दर्गा दर्या रोड, मुकूंदनगर, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शुक्रवारी हद्दीत पेट्रोलींग करत असताना अंमली पदार्थ विक्री प्रकरणातील सराईत गुन्हेगार औरंगजेब उर्फ रंगा हा उरुळी कांचन येथे चरस विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार योगेश मांढरे, युवराज कांबळे यांना समजली. (Pune Crime News)

पथकाने उरुळी कांचन येथील पांढरस्थळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. त्यावेळी अन्सारी हा रस्त्यावर काळ्या रंगाची सॅक घेऊन उभा असलेला दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या बॅगेची तपासणी केली. त्यावेळी बॅगमध्ये 24 लाख रुपये किंमतीचे दोन किलो चरस, मोबाईल असा एकूण 24 लाख 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर एक वर्षापूर्वी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार होता.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Add CP Ramnath Pokle), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे (Police Inspector Sunil Thopte),
पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), एस.डी. नरके पोलीस अंमलदार संतोष देशपांडे,
संदीप जाधव, प्रशांत बोमादंडी, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, साहिल शेख, संदिप शेळके,
योगेश मांढरे, युवराज कांबळे, आझीम शेख, नितीन जगदाळे, दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Crime branch arrests criminal who came to sell charas in Pune, seized goods worth 24 lakhs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | उद्धव ठाकरे चुकले! ठाकरे गटाच्या खासदाराने व्यक्त केली नाराजी, म्हणाले- ‘तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होत तर…’

Mumbai Crime News | अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी, धर्मेंद्रच्या निवासस्थानी बॉम्बस्फोटाची धमकी, आरोपीला पुण्यातून अटक

NAAC | राज्यातील सर्व महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन आणि मानांकन अनिवार्य; अन्यथा प्रवेशप्रक्रिया होणार रद्द