Pune Crime News | पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला भरदिवसा लुटणार्‍या 5 जणांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक, पंपावरील कर्मचार्‍याचा समावेश

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला भरदिवसा लूटप्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश आले असून, यात पेट्रोल पंपावरील कामगाराचा समावेश आहे. पथकाने सापळा रचून पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत.

Crime Branch arrests gang of 5 who robbed petrol pump manager all day long, including a pump employee

उबेद अन्सार खान (वय 20, हडपसर), अरबाज नवाब पठाण (वय 19), तालीम आसमोहमद खान
(वय 20), अजीम उर्फ अंट्या महंमद हुसेन शेख (वय 22), प्रजोत कानिफनाथ झांबरे (वय 20)
अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Burglary in Pune | धनकवडी परिसरातील फ्लॅट भरदिवसा फोडला, 5 लाखाची रोकड चोरली

प्रजोत झाबरें हा पेट्रोल पंपावरील कामगार आहे. तर मुख्य आरोपी हा उबेद खान आहे. वानवडी
येथील सय्यदनगर भागात पेट्रोल पंप आहे. येथे बाळासाहेब आंभोरे हे मॅनेजर आहेत.

Jitendra Awhad । म्हाडाची घरे कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना देण्याचा वाद, मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा

यादरम्यान गेल्या आठवड्यात बाळासाहेब हे दोन दिवसांची रोकड घेऊन बँकेत भरणा करण्यासाठी
जात होते. यावेळी त्यांना अडवून लुटण्यात आले होते. त्यांच्या जवळची 8 लाख 74 हजार रुपयांची
रोकड लुटली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

यादरम्यान युनिट पाचच्या पथकाने तबल 19 किलोमीटर परिसरातील अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे
चेक केले. त्यात काही ठिकाणी आरोपी कैद झाले होते.

महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या

त्यातून मग या आरोपींचा माग काढला जात होता. पथकाने शोध घेत या पाच जणांना अटक केली.
त्यांच्याकडे चौकशी केलो असता त्यांना पैश्यांची चणचण भासत होती.

Delhi High Court | घटस्फोट प्रकरणी HC चा महत्वपूर्ण निर्वाळा ! ’18 वर्षांचा झाल्यानंतरही मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी वडिलांवरच’

तर मौज मजा करण्यासाठी देखील पैसे नव्हते. यामुळे त्यांनी हा प्लॅन आखला. त्यांनी काही दिवस पेट्रोल पंपावर पाळत ठेवली. तसेच, येथील कामगार प्रजोत याला या कटात सहभागी करून घेतले.

Fake Call Centre Mumbai | मुंबईत 2 बनावट कॉलसेंटरवर छापे, दोघांना अटक

त्यानुसार त्याच्याकडून किती पैसे जमतात. कधी बँकेत भरणा केला जातो, याची माहिती मिळवली आणि त्यानुसार हा लुटमारीचा थरार घडला.

Udayanraje Bhosale । गोरगरिबांना न्याय देणारी मुश्रीफ यांच्या कामाची पद्धत

उबेद हा सराईत गुन्हेगार असून, तो पुण्यासह ग्रामीण पोलिसांच्या एकूण चार गुन्ह्यात फरार
असल्याचे समोर आले आहे. तर इतरही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस
आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या

धक्कादायक ! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक निरीक्षक संतोष तासगवकर, प्रसाद लोणारे, कर्मचारी महेश वाघमारे, अश्रूबा मोराळे, अजय गायकवाड, रमेश साबळे, प्रवीण काळभोर,

फेसबुक ला लाईक करा

दीपक लांडगे, दत्ता ठोंबरे, चेतन चव्हाण, विशाल भिलारे, विनोद शिवले, दाऊद सैय्यद, प्रमोद टोळेकर, अमरचंद्र उगले, विलास खदारे, संजय दळवी, स्वाती गावडे, स्नेहल गावडे यांच्या पथकांस केली आहे.

हे देखील वाचा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime News | Crime Branch arrests gang of 5 who robbed petrol pump manager all day long, including a pump employee

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update