Pune Crime News | हायप्रोफाईल सोसायटयांमध्ये घरफोडया करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेकडून अटक ! 1 कोटी 21 लाखांचा ऐवज जप्त; म्होरक्या उजाला उर्फ रॉबिन हुडवर 27 गुन्हयांची नोंद

Pune Crime News | Crime branch arrests inter-state gang that burglarizes high-profile societies! 1 Crore 21 Lakhs forfeited; Mhorkya Ujala alias Robin Hood has 27 criminal records
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गुगल सर्चवरून (Google Search) हायप्रोफाईल आणि पॉश सोसायटयांची माहिती काढून जग्वार कारमधून घरफोडया करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे (Pune Police Crime Branch). त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 21 लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) आणि नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. अटकेतील आरोपींकडून अनेक महत्वाचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता असून टोळीचा म्होरक्या मोहम्मद इरफान उर्फ उजाला उर्फ रॉबिन हुड (रा. गाव जोगिया, पो. गाढा, थाना पुपरी, जि. सीतामढी, बिहार) याच्याविरूध्द उत्तरप्रदेश, दिल्ली, बिहार, पंजाब, गोवा, तामिळनाडूमध्ये गँगस्टर अ‍ॅक्ट, आर्म अ‍ॅक्ट आणि घरफोडीचे असे एकुण तब्बल 27 गुन्हे दाखल आहेत. (Pune Crime News)

पोलिसांना मोहम्मद इरफान उर्फ उजाला उर्फ रॉबिन हुड (रा. गाव जोगिया, पो. गाढा, थाना पुपरी, जि. सीतामढी, बिहार) याच्यासह शमीम शेख (मुळ रा. बिहार), अब्रार शेख आणि राजु म्हात्रे (दोघे रा. धारावी, मुंबई) यांना अटक केली आहे तर सुनिल यादव, पुनित यादव आणि राजेश यादव (तिघे रा. गाजियाबाद, उत्तरप्रदेश) हे तामिळनाडू पोलिसांच्या कस्टडीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 10 फेबु्रवारी 2023 रोजी बाणेर रोडवरील सिंध सोसायटीमध्ये रात्रीच्या वेळी हॉलच्या खिडकीचा कोयंडा उचकटून त्याव्दारे घरात प्रवेश करून घरातील कपाटातील परदेशी बनावटीचे पिस्तुल, जिवंत काडतुसे, 3 किंमती घडयाळे, 4 तोळे वजनाची चेन आणि 2 लाख रूपये चोरटयांनी चोरून नेले होते. त्याबाबत चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा दाखल आहे. चोरटयाने परदेशी बनावटीचे पिस्तुल आणि 12 जिवंत काडतुसे चोरून नेल्यामुळे गुन्हयाचा जलदगतीने तपास करण्याच्या सुचना पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह आयुक्त संदीप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik) यांनी दिला होता. (Pune Crime News)

गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पाकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनिल पवार आणि नारायण शिरगावकर यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना तपासाच्या सुचना दिल्या. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हयाचा तपास केला असता आरोपींनी चोरी करण्यासाठी बनावट नंबर प्लेट लावून जग्वार कारचा वापर केल्याचे समोर आले. पोलिसांनी तब्बल 200 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यांनी पुणे-नाशिक मार्गावरील एका फुटेजची तपासणी केली असता जग्वार कारचा खरा नंबर प्राप्त झाला. त्यावरून पोलिसांनी सखोल तपासास सुरूवात केली. त्यानंतर टोळीचा म्होरक्या रॉबीन हुड आणि त्याच्या साथीदारांनी सिंध सोसायटीमध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची 2 पथके तातडीने गाजियाबाद येथे रवाना करण्यात आली. आरोपी रॉबीन हुड ला दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा राज्यात वेगवेगळी ठिकाणी बदलून रहात होता. सलग 8 दिवस आरोपींचा माग काढत अखेर मुख्य सुत्रधार रॉबीन हुड याला पोलिसांनी पंजाबमधील जालंधर येथून ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक विजय गुरव, पोलिस हवालदार शैलेश सुर्वे, सयाजी चव्हाण, पोलिस नाईक सारस साळवी, अमोल आव्हाड यांनी जालंधरमध्ये बिगारी कामगारांचा वेश परिधान करून रॉबीन हुडला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली जग्वार कार, चोरीचे पिस्तुल आणि सोन्याचे दागिने जप्त केले. आरोपी रॉबीन हुड हा चोरलेली किंमती घडयाळे त्याचा मित्र शमीम शेख (मुंबई) याला विक्रीसाठी देत होता अशी माहिती समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील आणि त्याच्या पथकास मुंबईला रवाना केले.

गुन्हयासंदर्भातील सखोल माहिती काढून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी किंमती घडयाळे विक्रीस आलेल्या शमीम शेख, अब्रार शेख आणि राजु म्हात्रे यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी विशाखापट्टणम येथील घरफोडीमधील 7 किंमती घडयाळे आणि सिंध सोसायटीमध्ये झालेल्या चोरीच्या गुन्हयातील 3 अशी एकुण 10 किंमती घडयाळे जप्त केली. आरोपी रॉबीन हुड हा अनेक राज्यामध्ये चोरीचे गुन्हे करताना वेगवेगळे साथीदार घेत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून एकुण 1 कोटी 21 लाख रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

चोरीच्या पैशामधून समाजकार्य

आरोपी रॉबीन हुड हा चोरी केलेल्या ऐवजाची विक्री करून मिळालेल्या पैशांमध्ये समाजिक कार्य करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे काही व्हिडीओ देखील युटयूबवर पहावयास मिळतात.
त्याने चोरीच्या पैशातून काही गावांचे रस्ते केले आहेत तर काही गरीब मुलींच्या विवाहास आर्थिक मदत केली आहे.
रॉबीन हुड याला पोलिसांनी नुकताच जालंधर येथून पुण्यात आणले आहे. त्याच्याकडे सखोल तपास करणे बाकी आहे.
जग्वार कार ही धनपाल सिंग याची असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मात्र, त्याला सदरील गुन्हयामध्ये आरोपी केले आहे काय याबाबत पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांना विचारले
असता त्यांनी सदरील बाब ही तपासाचा भाग असल्याचे सांगितले.
गुन्हे शाखेचे पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे,
उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनिल पवार, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे
शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर (Sr PI Pratap Mankar), गणेश माने
(Sr. PI Ganesh Mane), अजय वाघमारे (Sr PI Ajay Waghmare), सहाय्यक निरीक्षक विकास जाधव
(API Vikas Jadhav), नरेंद्र पाटील (API Narendra Patil), पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव
(PSI Mohandas Jadhav), पोलिस अंमलदार विजय गुरव, अस्लम आत्तार, शैलेश सुर्वे, सयाजी चव्हाण,
अमोल आव्हाड, सारस साळवी, हरीष मोरे, प्रविण भालचिम, राजेंद्र लांडगे, विनोद महाजन, अशोक शेलार,
संजय आढारी, स्वप्निल कांबळे, ज्ञानेश्वर मुळे, वैभव रणपिसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Web Title :- Pune Crime News | Crime branch arrests inter-state gang that burglarizes high-profile societies! 1 Crore 21 Lakhs forfeited; Mhorkya Ujala alias Robin Hood has 27 criminal records

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | निवडणूक हरण्याच्या भीतीपोटी भाजप लोकशाहीचा गळा घोटत आहे – रवींद्र धंगेकर

Parbhani Accident News | दुर्दैवी ! रुग्णालयात जाताना आजोबा आणि नातवाचा भरधाव बसच्या टायरखाली चिरडून मृत्यू

Pune Crime News | खराडीत जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 16 जणांवर कारवाई

Total
0
Shares
Related Posts
Amravati Assembly Constituency | mla sulbha khodke suspended from congress for six years for doing anti party activities she likely to join ajit pawar ncp

Amravati Assembly Constituency | पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन; आता सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत

Sayaji Shinde On Sushma Andhare | sushma andhare criticism on ncp ajit pawar entry and now the sayaji shinde counterattack

Sayaji Shinde On Sushma Andhare | ‘सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला’, राष्ट्रवादीच्या प्रवेशावर सुषमा अंधारेंचा निशाणा; शिंदेंचा पलटवार; म्हणाले – ‘मी सुषमा अंधारे यांना विचारून निर्णय घेत नाही’