Pune Crime News | ‘गेम’ केल्याशिवाय चप्पल न घालण्याची घेतली होती शपथ ! डुक्कर खिंडीत बिल्डरवर झालेल्या गोळीबाराचं ‘गुढ’ उकललं, गुन्हे शाखेकडून ‘पर्दाफाश’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डुक्कर खिंडीत भल्या सकाळी झालेल्या ‘त्या’ गोळीबाराचे प्रकरण उघडकीस आणत गुन्हे शाखेने एकाला अटक (Arrest) केली आहे. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कृत्य केल्याचं असल्याचे समोर आले आहे. त्याने बिल्डरचा खून केल्या शिवाय चप्पल न घालण्याची शपथ घेतली होती.

Pune News : पुण्यात भरदिवसा बिल्डरवर गोळीबार, प्रचंड खळबळ; पोलिस घटनास्थळी दाखल

अभिजीत तुकाराम येलवंडे (वय 24) याला अटक Arrest केले आहे. तर मुख्य आरोपी नकुल शाम खाडे याच्यासह चेतन चंद्रकांत पवार व उमेश चिकणे यांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शनिवारी सकाळी साडे नऊ ते 10 वाजण्याच्या सुमारास बिल्डर रविंद्र सखाराम तागुंदे (वय 36) यांच्यावर चार अज्ञातांनी येऊन गोळीबार केला होता. गोळीबाराची घटना समोर येताच शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. या दरम्यान हा गोळीबार सीसीटीव्हीत कैद झाला. हल्लेखोरांनी 4 गोळ्या झाडल्या होत्या. पण, सुदैवाने पळून जात रवींद्र यांनी आपला जीव वाचला होता.

गोळीबाराचे प्रकरण समोर येताच गुन्हे शाखेच्या पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तात्काळ हल्लेखोर यांची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, खंडणी विरोधी पथकाचे पोलिस नाईक राजेंद्र लांडगे व नितीन रावळ यांना गोळीबारातील आरोपी अभिजित हा गोसावी वस्तीत येणार आहे, अशी माहिती मिळाली. पथकाने त्याला सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे सखोल माहिती घेतली असता त्याने बिल्डर रवींद्र यांच्यावर गोळीबार केला असल्याची माहिती दिली. साथीदार यांच्यासोबत हा गोळीबार केला असून, रवींद्र याने त्यांचा मित्र दीपक सोनवणे याचा खून केला होता. 2013 हा खून झाला होता. त्यानंतर या खून प्रकरणात रवींद्र जामिनावर आहे. अद्याप गुन्ह्य न्यायप्रविष्ट आहे. त्याची सुनावणी सुरू आहे.

त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी नकुल खाडे याने शपथ घेतली होती. तर रवींद्र याचा खून केल्याशिवाय चप्पल घालणार नसल्याचे शपथ घेताना म्हंटले होते. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक निरीक्षक संदीप बुवा, पोलीस नाईक नितीन कांबळे, नितीन रावळ, राजेंद्र लांडगे, विवेक जाधव यांच्या पथकाने केली आहे.

Also Read This : 

Pune News : तळेगाव ढमढेरे येथे दिवसाढवळ्या खून, प्रचंड खळबळ

घरबसल्या ‘ओम’च्या जापाबरोबरच करा हा व्यायाम, फुफ्फुसांमध्ये येईल मजबुती; जाणून घ्या

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब आढळल्याने खळबळ !

केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात, तर कोरोना संक्रमणापासून दूर रहा; जाणून घ्या कारण?

प्रियकराने सैन्यात भरती होताच दिला धोका, लग्नाला नकार देताच तरुणीने काढली ‘वरात’