Pune Crime News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 26 लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थांचा (मॅफेड्रॉन (एमडी), चरस, गांजा) साठा डेक्कन, कोंढवा आणि पुणे स्टेशन परिसरातून जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक-2 ने (Anti Narcotic Cell Pune) 25 लाख 94 हजार 880 रूपये किंमतीचे मॅफेड्रॉन (एम.डी.) (Mefedron MD), चरस (Charas) आणि गांजा (Ganja) जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांना वेगवेगळया ठिकाणांवरून अटक करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातील माल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

संकल्प सुरेश सपकाळ Sankalp Suresh Sapkal (33, रा. बी.डी. चाळ, बिल्डींग नं. 11, रूम नं. 51, वरळी, डॉ. जी.एम. भोसले मार्ग, मुंबई Dr. JM Bhosale Marg Mumbai), शाहरूख मुस्तफा बेग Shahrukh Mustafa Baig (21, रा. सर्व्हे नं. 12, गल्ली नं. 5, आंबेडकरनगर, कोंढवा, पुणे – Ambedkar Nagar Kondhwa), मंटु रामबाबु राय Mantu Rambabu Roy (33, रा. कौवा चौक, मु.पो. जौरापुर, जि. समस्तीपुर, बिहार – Samastipur Bihar) आणि राकेशकुमार रामनाथ दास Rakeshkumar Ramnath Das (19, रा. मु.पो. खुसरूपुर, जि. पटणा, बिहार – Patna Bihar) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 16 मे 2023 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-2 चे पोलिस डेक्कन पोलिस स्टेशनच्या (Deccan Police Station) हद्दीत पेट्रोलिंग (Police Patrolling) करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार संदिप शेळके (Police Sandeep Shelke) आणि पोलिस अंमलदार योगेश मांढरे (Police Yogesh Mandhare) यांना आरोपी संकल्प सकपाळ हा सेन्ट क्रिस्पीस होम चर्च व शाळेला लागून असलेल्या एरंडवणे (Erandwane) येथील फुटपाथवर थांबवला असून त्याच्याकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी संकल्प सकपाळला ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 11 लाख रूपये किंमतीचे 55 ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले असून त्याच्याविरूध्द डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे.

दि. 18 मे 2023 रोजी पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना कोंढवा पोलिस स्टेशनच्या (Kondhwa Police Station) हद्दीत शाहरूख हा संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे अंमली पदार्थ असल्याचे समजले. त्यानंतर शाहरूखला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 1 लाख 40 हजार रूपये किंमतीचे मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले. त्याच्याविरूध्द कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

दि. 20 मे 2023 रोजी आरोपी मंटु आणि राकेशकुमार यांच्याबाबत पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना
माहिती मिळाली होती. बंडगार्डन पोलिस स्टेशनच्या (Bundgarden Police Station) हद्दीतील पुणे रेल्वे स्टेशनच्या
(Pune Railway Station) पार्सल गेट समोरील सार्वजनिक रस्त्यावरून आरोपी मंटू आणि राकेशकुमारला
ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडील 12 लाख 73 हजार 880 रूपये किंमतीचा 63 किलो 694 ग्रॅम गांजा
पोलिसांनी जप्त केला.

Advt.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे
(DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवकर (ACP Satish Govekar) यांच्या
मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल थोपटे (Sr PI Sunil Thopate),
पोलिस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), पोलिस उपनिरीक्षक शुभांगी नरके
(PSI Shubhangi Narke), पोलिस अंमलदार योगेश मांढरे, पोलिस संदिप शेळके, पोलिस शिवाजी घुले,
पोलिस संतोष देशपांडे, पोलिस संदिप जाधव, पोलिस प्रशांत बोमादंडी, पोलस रविंद्र रोकडे, पोलिस मयुर सुर्यवंशी,पोलिस महेश साळुंके, पोलिस साहिल शेख, पोलिस दिशा खेवलकर, पोलिस नितीन जगदाळे, पोलिस आझीम शेख,
पोलिस युवराज कांबळे आणि पोलिस दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : Pune Crime News | Crime Branch of Pune City Police seized narcotic drugs (Maphedrone (MD), Charas, Ganja) worth Rs.26 lakh from Deccan, Kondhwa and Pune station area.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘ज्यांच्याकडे पांढार पैसा असेल त्यांना…’, नोटबंदीवर फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं (व्हिडिओ)

ACB Trap News | 20 हजाराच्या लाच प्रकरणी कोपरगावच्या तहसीलदारासह खाजगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune NCP News | पुण्यात राष्ट्रवादीतर्फे आरबीआय कार्यालयासमोर दोन हजार रुपयांच्या नोटेचा श्रद्धांजली कार्यक्रम ! (व्हिडीओ)