Pune Crime News | बेकायदेशीर पिस्तुल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

निलेश विठ्ठल शिंदे (वय 30, रा. सर्वे नं.13 रासकरचाळ हडपसर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात बेकायदेशीर धंदे करणारे तसेच घातक शस्त्र घेऊन फिरणाऱ्यावर नजर ठेवत त्यांना
पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान अमली पदार्थ विरोधी पथक हद्दीत गस्त
घालताना पोलीस कर्मचारी संदीप शेळके याना माहिती मिळाली की, एकजण गावठी बनावटीचे
पिस्तूल बाळगून नवले ब्रिज जवळ थांबला आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला पकडले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस मिळून आले आहेत. त्याने हे पिस्तुल कोठुम आणि कशासाठी आणले होते, याचा तपास करत आहेत.

अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर आणि पथकातील बोमदांडी, देशपांडे, चेतन गायकवाड, महेश साळुंखे यांनी केली आहे.

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘हे सरकार आहे की सर्कस आहे?’ (व्हिडीओ)

Dhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची मोठी घोषणा ! 10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना 2 लाखांचे अनुदान

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pune crime news | crime branch of pune police arrest criminal and recover pistol

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update