Pune Crime News | तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येऊन दहशत निर्माण करणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन – तडीपार काळात देखील मध्यवस्तीत येत कोयता घेऊन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अरबाज उर्फ बबन इक्बाल शेख (वय 23) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाहिजे आरोपी व सराईत गुन्हेगाराची माहिती काढून त्यांना पकडले जात आहे. तर त्यांच्या हलचालीवरही पाळत ठेवली जात आहे. गुन्हे शाखा यावर कडक लक्ष ठेवून आहे. यादरम्यान गुन्हे शाखा युनिट एकचे पथक गस्त घालताना कर्मचारी अजय थोरात यांना माहिती मिळाली की, भवानी पेठेत कुविख्यात गुंड अरबाज हा आला असून तो हातात कोयता घेऊन फिरत मोठ्याने आरडाओरडा करत गोंधळ घालत आहे.

तर नागरिकांना शिवीगाळ करत आहे. त्यानुसार पथकाने लागलीच येथे धाव घेत त्याला जेरबंद केले.
चौकशीत अरबाज याला 4 जानेवारी रोजी शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
मात्र तडीपार आदेशाचा भंगकरुन तो भवानी पेठ परिसरातील चुडामन तालीम चौकात आला आणि
धिंगाणा घालत असल्याचे समोर आले आहे.

यामुळे सराईत गुन्हेगारांना पोलिसांच्या तडीपार कारवाईचे काहीच वाटत नसल्याचे दिसून येत आहे.
त्याला खडक पोलीसांकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आले आहे. अरबाज शेख हा सराईत गुन्हेगार
आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त सुरेंद्र
देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, संजय
गायकवाड, कर्मचारी विजेसिंग वसावे, अजय थोरात, अशोक माने, अमोल पवार, तुषार माळवदकर,
महेश बामगुडे, शशीकांत दरेकर यांनी केली आहे.

हे देखील वाचा

पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

Devendra Fadnavis | ‘महाविकास आघाडी सरकारकडून OBC आरक्षणाचा खून’ (व्हिडीओ)

cm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime News | crime branch of pune police arrest one criminal today 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update