Pune Crime News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून शहरात मोठया प्रमाणावर चरसची विक्री करून स्वतःकडे घातक शस्त्राचा साठा बाळगणार्‍याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शहरात मोठया प्रमाणावर चरसीची (Charas Drugs) विक्री करून स्वतःजवळ घातक शस्त्रांचा (Weapon) साठा बाळगणार्‍याला पुणे शहर पोलिसांच्या Pune City Police गुन्हे शाखेच्या युनिट-1 च्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 5 लाख 72 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

सागर सुभाष मोडक Sagar Ashok Modak (43, रा. 1367, सदाशिव पेठ, ऑर्चिड बिल्डींग, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. युनिट-1 मधील पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार हे खडक पोलिस स्टेशनच्या परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार अनिकेत बाबर यांना सदाशिव पेठेतील नातुबाग येथील ऑर्चिड बिल्डींगजवळ एकजण चरसची मोठया प्रमाणावर विक्री करीत आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन त्याला अटक केली. आरोपी सागर मोडकची अंगझडती आणि घरझडती घेतली असता त्याच्याकडे 5 लाख 19 हजार रूपयांची चरस, 6 हजार 550 रूपये किंमतीच्या 3 तलवारी, 2 कुकरी, 1 सत्तुर, 1 कुर्‍हाड, चाकु, रापी आणि 16 हजार रूपये किंमतीच्या 32 नग चिलीम आढळून आल्या. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 5 लाख 72 हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. (Pune Crime News)

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे
(DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद (Sr PI Shabbir Sayyad), पोलिस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी
(PSI Sunil Kulkarni), पोलिस उपनिरीक्षक अजय जाधव (PSI Ajay Jadhav), पोलिस अंमलदार अनिकेत बाबर,
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राहुल मखरे, पोलिस शशिकांत दरेकर, दत्ता सोनावणे, पोलिस विठ्ठल साळुंखे,
महिला पोलिस रूक्साना नदाफ आणि पोलिस तुषार माळवदकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :  Pune Crime News | Crime Branch of Pune Police arrested a person who sold large quantities of hashish in the city and was possessing a stock of dangerous weapons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘लोकसभेच्या ‘त्या’ 22 जागा आमच्याच’, कीर्तिकरांच्या दाव्यावर भाजपची प्रतिक्रिया

Pune Pimpri Chinchwad Crime News | सीएम ऑफिसमधील अधिकारी असल्याचे सांगत शैक्षणिक संस्थाचालक, पालकांची फसवणूक; एकाला अटक

Pune Crime News | पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून अंमली पदार्थाचा (एल.एस.डी.) मोठा साठा जप्त ! 1 कोटी 14 लाखाचे 41 हजार 986 मिलीग्रॅम LSD हस्तगत