Pune Crime News | जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 17 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात सुरु असलेल्या अवैध जुगार अड्यांवर (Gambling Den) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell) कारवाईची मोहीम उघडली आहे. पथकाने गुरुवार पेठेत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 17 जणांवर कारवाई केली. यावेळी 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही (Pune Crime News) कारवाई खडक परिसरात गुरुवारी (दि.23) केली.

 

खडक परिसरातील गुरुवार पेठेत काही व्यक्ती बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती पथकातील पोलीस अंमलदार यांना समजली. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून गुरुवारी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी काही जण पैशांवर जुगार खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले. पथकाने 16 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 29 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 17 जाणांवर खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा दाखल केला आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या 16 जणांना पुढील कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Pune Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार बाबा कर्पे, मनिषा पुकाळे,
तुषार भिवरकर, इरफान पठाण, इम्रान नदाफ, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Crime branch raid on gambling den, action taken against 17 people

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Chinchwad Bypoll Election | प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चिंचवडमध्ये 14 लाखांची रोकड जप्त, परिसरात खळबळ

Onkar Bhojane | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजनेला बड्या चित्रपटांची ऑफर

Maharashtra Politics | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्यांना सुप्रीम कोर्टाकडून 21 मार्चपर्यंत स्थगिती