Pune Crime News | दत्तनगर परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 8 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या पणती पोकळी जुगार अड्ड्यावर (Gambling Den) छापा टाकून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell) 8 जणांवर कारवाई (Pune Crime News) करुन 6 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि.3) दत्तनगर कात्रज परिसरात केली.

 

दत्तनगर कात्रज परीसरात काहीजण बेकायदेशीर पणती पोकळी सोरट जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पथकाने पाळत ठेवून छापा टाकला. (Pune Crime News) त्यावेळी काही जण जुगार पैसे लावून खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले. पथकाने 8 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण 6 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 8 जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) महाराष्ट्र जुगार बंदी (Maharashtra Gambling Ban) कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ताब्यात घेतलेल्या 8 जणांना आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav), सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), अनिकेत पोटे (API Aniket Pote) पोलीस अंमलदार अजय राणे, इरफान पठाण, हनुमंत कांबळे व अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Crime Branch raided a gambling den in Duttnagar area, action taken against 8 persons

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Chinchwad Crime | हातात कोयते घेऊन टोळक्याचा राडा, पिंपरीतील बौद्धनगर मधील घटना; 9 जणांवर FIR

CM Eknath Shinde | राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहकारी संस्था केंद्र सरकारच्या रडारवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

Manoj Bajpayee | राम गोपाल वर्मा यांच्या स्वभावाबाबत मनोज बाजपेयींनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले “तो स्वतःच्या मनाचा राजा…”