Pune Crime News | खराडीत जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 16 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) छापा टाकून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell) 16 जणांवर कारवाई (Pune Crime News) करुन 34 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि.24) खराडी बायपास परिसरात केली.

खराडी परीसरात काहीजण बेकायदेशीर मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पथकाने पाळत ठेवून छापा टाकला. (Pune Crime News) त्यावेळी काही व्यक्ती मटका जुगार पैसे लावून खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले. पथकाने 15 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण 34 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 16 जणांवर विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) महाराष्ट्र जुगार बंदी (Maharashtra Gambling Ban) कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. तर ताब्यात घेतलेल्या 15 जणांना पुढील कारवाईसाठी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav), सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, संदीप कोळगे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | Crime Branch raids gambling den in Kharadi, action taken against 16 persons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | निवडणूक हरण्याच्या भीतीपोटी भाजप लोकशाहीचा गळा घोटत आहे – रवींद्र धंगेकर

Parbhani Accident News | दुर्दैवी ! रुग्णालयात जाताना आजोबा आणि नातवाचा भरधाव बसच्या टायरखाली चिरडून मृत्यू