Pune Crime News | मार्केट यार्ड आणि बिबवेवाडी परिसरातील जुगार आड्ड्यावर गुन्हे शाखेचे छापे, 18 जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर (Gambling Den) छापा टाकून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell) 18 जणांवर कारवाई (Pune Crime News) करुन 52 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि.24) मार्केट यार्ड आणि बिबवेवाडी परिसरात केली.

 

मार्केट यार्ड परिसरात रम्मी पत्त्याचा जुगार (Rummy Card Gambling) खेळत व खेळवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पथकाने पाळत ठेऊन जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता 10 जण पत्ते खेळताना आढळून आले. पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 41 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 11 जणांवर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमांतर्गत (Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा दाखल करुन पुढील कारवाईसाठी मार्केट यार्ड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने दुसरी कारवाई बिबवेवाडी परिसरात केली. बिबवेवाडी येथे कल्याण जुगार खेळत व खेळवला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार छापा टाकून 7 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 10 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior PI Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote) पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, अजय राणे,
बाबा कर्पे, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Crime Branch raids gambling dens in Market Yard and Bibvewadi area, action against 18 people

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Vidhimandal Adhiveshan | विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन 17 जुलै रोजी मुंबईत

All India Bank Employees Association (AIBEA) | मोदी सरकार कामगार संघटनांविरोधात – सी. एच. व्यंकटचलम्

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले- ‘एका अहंकारी व्यक्तीमुळे मुंबईचा…’

Majestic Aamdar Niwas | ‘दि मॅजेस्टिक’ आमदार निवास वास्तू नूतनीकरणाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन