पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये बेकायदेशीर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell) लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन कल्याण मटका घेणाऱ्यांवर कारवाई केली आहे. ही कारवाई (Pune Crime News) शुक्रवारी (दि.17) वाकवस्ती येथे करण्यात आली असून 7 जणांवर कारवाई केली आहे.
लोणी काळभोर येथील वाकवस्ती परिसरात काही व्यक्ती बेकायदेशीरपणे मटका जुगाराची कटींग घेऊन तसेच मोबाईलवर व्हॉट्सअॅवर ऑनलाईन कल्याण मटका घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून वाकवस्ती येथे छापा टाकून 7 जणांवर कारवाई केली. तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा एकूण 79 हजार 470 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor police station) महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत (Maharashtra Gambling Ban) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
(Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav), सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote), अनिकेत पोटे (API Aniket Pote) पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Crime News | Crime branch raids online gambling den in
Loni Kalbhor police station limits, action taken against 7 persons
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nitin Gadkari | संरक्षण सामग्री निर्यात करणारा देश म्हणून भारताची ओळख
Chandrakant Patil | संशोधनाद्वारे विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याची गरज – चंद्रकांत पाटील
24×7 Water Supply – Pune PMC | समान पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करा – चंद्रकांत पाटील