Pune Crime News | हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारास गावठी पिस्तुलासह अटक

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime News |शिरूर तालुक्याच्या शिक्रापूर (Shikrapur) परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुंडास शिक्रापूर पोलिसांनी गावठी पिस्तुलासह गजाआड केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे (Police Inspector Hemant Shedge) यांनी दिली. याप्रकरणी वैभव संभाजी आदक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Pune Crime News | criminal arrested with sword in hand

याबाबत शिक्रापूर पोलिसांनी (Shikrapur Police) दिलेल्या माहितीनुसार,
शिक्रापूर तळेगांव ढमढेरे रस्त्यावर (Shikrapur Talegaon Dhamdhere Road) लक्ष्मीमाता मंदिर परिसरात एक व्यक्ती हातात तलवार घेऊन दहशत करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता आरोपी हा तलवार घेऊन फिरत असल्याचे पोलिसांना दिले.
पोलिसांनी आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले.
यावेळी आरोपीच्या गाडीची तपासणी केली असता,
गाडीच्या सीट खाली जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल मिळून आला.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तलवार, गावठी पिस्तूल, काडतूस, धारदार सुरा व कार असा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, पोलिस हवालदार जितेंद्र पानसरे,
पोलिस नाईक अमोल दांडगे, श्रीमंत होनमने, शिवाजी चीतारे, विकास पाटील आदींनी केली आहे.
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून विविध कंपन्यांमध्ये धमकावणे,खंडणी वसूल करणे आदी गंभीर स्वरूपाच्या सवयीचा असून कोणाची तक्रार असेल तर शिकाप्रुर पोलिसांना संपर्क साधण्याचे
आवाहन पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.

Web Title : Pune Crime News | criminal arrested with sword in hand

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Former Cricketer Yashpal Sharma | माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांचं निधन, 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत बजावली होती मोलाची कामगिरी

Chandrapur Crime News | जनरेटरच्या धुरामुळे गुदमरुन 6 जणांचा मृत्यु

Pune Crime | ज्योतिषाचार्य रघुनाथ येमूलच्या अडचणीत आणखी वाढ; पुणे पोलिसांनी उचलले ‘हे’ पाऊल