Pune Crime News | सायबर भामट्यांची फास्ट टॅगवर वक्रदृष्टी, करताहेत ‘हा’ उद्योग

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Pune Crime News | टोल नाक्यावर ‘फास्ट टॅग’ (Fastag) बंधनकारक केल्यानंतर सायबर चोरट्यांनी (Cyber ​​thief) यावर ‘नजर’ वळवली असून, गाडी घरात आणि तरीही गाडी टोलनाका क्रॉस केल्याची Entry पडत पैसे कट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर काही प्रकरणात ‘फास्ट टॅग’ला रिचार्ज करून देतो, असे म्हणत चोरटे गोपनीय माहिती घेऊन पैसे उकळत आहेत. याबाबत पुणे पोलिसांकडे (Pune Police) तक्रारी आल्या आहेत. pune crime news | cyber crime in fastag

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात एकूण 9 तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या (economic offences wing pune) सायबर पोलीस (Cyber Crime Police) तपास सुरू केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

मिळालेल्या माहितीनुसार, शासनाने सर्व टोलनाक्यावर 15 फेब्रुवारीपासून वाहनांना फास्ट टॅग बंधनकारक केला आहे. त्यानुसार सर्वांनीच वाहनांना फास्ट टॅग लावला आहे. त्यानुसार टोलनाका क्रॉस केल्यानंतर तुमच्या खात्यातून नियमानुसार पैसे कट होतात. टोलनाक्यावर रांगा लागत असल्याने आणि वेळ जात असल्याने हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शासनाने ही सुविधा सुरू केला आहे.

मात्र आता हायटेक सायबर चोरट्यांनी यावरही नजर फिरवली आहे.
आतापर्यंत पुणे पोलिसांच्या (Pune Police) सायबर शाखेकडे (Cyber Cell Pune) पुण्यातून 9 तक्रारी आल्या आहेत.
यात 6 तक्रारी या टोलनका क्रॉस केलेला नसताना आणि गाड्या घरी असतानाही पैसे कट झाले आहेत.
सर्वाधिक पैसे कट झाल्याची एक तक्रार दीड हजाराची आहे.
तर एक तक्रार 79 रुपये कट झाल्याची आहे.
तसेच तीन तक्रारी या सायबर चोरट्यांनी फास्ट टॅग धारक वाहन चालकाना फोनकरून तुमचा फास्ट टॅगचा रिचार्ज करून देतो,
असे सांगत त्यांच्या खात्याची गोपनीय माहिती मिळवली आहे. त्यामाध्यमातून त्यांच्या खात्यातून पैसे गायब केले आहेत.

याबाबत सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या (economic offences wing pune) पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके (deputy commissioner of police bhagyashree navtake) यांनी सांगितले की, 9 तक्रारी आल्या आहेत.
त्यानुसार तपास केला जात आहे. याबाबत फास्ट टॅग संबंधित कंपनीला देखील कळवले आहे.
नागरिकांनी कोणतीही गोपनीय माहिती देऊ, नये असे आवाहन केले आहे.

Web Title :- pune crime news | cyber crime in fastag

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp | ‘या’ अकाऊंट्सवरून चॅट्दरम्यान दिसणार नाही ऑनलाइन स्टेटस, लास्ट सीन सुद्धा नसेल

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,727 नवीन रुग्ण, तर 10,812 जणांना डिस्चार्ज

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी

Ladakh Standoff | 70 वर्षात वर्षात पहिल्यांदा भारताने बदलली भूमिका, चीनसोबत सीमेवर पुन्हा तैनात केले 50,000 सैनिक