पुण्यात पोलिसांसोबत धक्काबुक्की करणारे तिघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दत्तवाडीत गस्त घालणाऱ्या बीट मार्शलच्या पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. पोलिसांनी तिघांना अटक केली. किरण संजय गिरीगोसावी (वय २१), अमित दगडू निवंगुणे (वय २७) आणि रविराज संजय गिरीगोसावी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई राहूल गोसावी यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती दर्शन परिसरात रात्री बाराच्या सुमारास गोंधळ सुरु असल्याची माहिती पोलीस ठाण्याला मिळाली. त्यावेळी बीट मार्शलवर असणारे फिर्यादी राहूल यांना सांगण्यात आले. त्यानुसार ते सहकाऱ्यासोबत पर्वती येथील भामरे चौकात गेले.

त्यावेळी किरण, अमित, रविराज त्या ठिकाणी गोंधळ घालत होते. त्यामुळे राहूल यांनी त्यांना घरी जाण्यास सांगतले. त्याचा राग आल्यामुळे तिघांनी राहूलला अपशब्द वापरून धक्काबुक्की केली. तसेच गोंधळ घातला. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत अटक केली. अधिक तपास सहायक निरीक्षक शंकर सलगर करीत आहेत.