Pune Crime News | धक्कादायक! एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळले भीमा नदीपात्रात, दौंड तालुक्यातील खळबळजनक घटना

यवत/दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दौंड तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीच्या (Pargaon Gram Panchayatchy) हद्दीमध्ये भीमा नदीपात्रात (Bhima River) मागील पाच दिवसामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आले होते. ही घटना ताजी असतानाच याच कुटुंबातील बेपत्ता असलेल्या तीन लहान मुलांचे मृतदेह मंगळवारी (दि.24) दुपारी एकच्या सुमारास (Pune Crime News) आढळून आले आहेत.

 

आतापर्यंत आढळून आलेल्या मृतदेहांमध्ये दोन पुरुष दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. गेल्या सहा दिवसात सात मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्याने दौंड तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

मोहन उत्तम पवार (अंदाजे वय 50), संगीता मोहन पवार (अंदाजे वय- 45 दोघे रा. खामगांव ता. गेवराई), त्यांचा जावई शामराव पंडित फुलवरे (अंदाजे वय-32) त्याची पत्नी राणी शामराव फुलवरे (वय-27) त्यांचा मुलगा रितेश शामराव फुलवरे (वय-7), छोटू फुलवरे (वय-5), कृष्णा (वय-3) अशी मृत्यू झालेल्या सात जणांची नावे आहेत. माती वडार समाजातील भटकंती करणारे हे कुटुंब असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

 

बुधवारी (दि.18) भीमा नदीपात्रात स्थानिक मच्छीमार मासेमारी (Fishing) करत असताना त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर शुक्रवारी (दि.20) पुरुषाचा मृतदेह आढळला. शनिवारी (दि.21) पुन्हा एका महिलेचा तर रविवारी (दि.22) एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. पाच दिवसात चार मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. त्यातच मंगळवारी (दि.24) पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह नदीपात्रात आढळून आले आहेत.

 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal) यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व यवत पोलिसांची पथके तपासासाठी रवाना केली. दरम्यान रविवारी सापडलेल्या मृतदेहाजवळ एक चावी तर दुसऱ्या मृतदेहाजवळ मोबाईल आणि सोने खरेदीची पावती सापडल्याचे यवत पोलिसांकडून सांगण्यात आले. यावरुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

दरम्यान, नदी पात्रात सापडलेले मृतदेह ही आत्महत्या (Suicide) आहे की घातपात याचा तपास पोलीस करीत आहेत.
भीमा नदीपात्रात सलग मृतदेह सापडण्याची ही पहिलीच वेळ असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
हा घातपात आहे की आत्महत्या हे शवविच्छेदनानंतर उघड होणार आहे.
पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे (Yavat Police Station)
पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (Police Inspector Hemant Shedge) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | dead bodies of 4 people of the same family were found in
bhima river bed in pargaon area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा