Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : डेक्कन पोलिस स्टेशन – बँकेने नेमला रिलेशन मॅनेजर अन् त्यानेच घातला १ कोटी ६५ लाखाला गंडा; अभियंत्याच्या मृत्युनंतरही त्याच्या खात्यातून काढले पैसे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) वैयक्तिक सेवा देण्यासाठी इम्पेरिया रिलेशनशिप मॅनेजरची (Imperia Relationship Manager) नेमणूक केली. या मॅनेजरने विश्वास संपादन करुन पुण्यातील सेवानिवृत्त अभियंत्याच्या व त्याच्या पत्नीच्या खात्यातून वेगवेगळ्या लोकांच्या नावाने पैसे ट्रान्सफर करुन तब्बल १ कोटी ६५ लाख ८१ हजार ९११ रुपयांचा अपहार करुन फसवणूक (Cheating Case) केली. (Pune Crime News)

 

याप्रकरणी सुवर्णा गुप्ते (वय ४९, रा. सिंगापूर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एचडीएफसी बँकेचे रिलेशन मॅनेजर आकाश सिंह सुरेशसिंह राणा Manager Akash Singh Suresh Singh Rana (रा. बाणेर, मुळ मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल अभियंता होते. ते १९९८ मध्ये निवृत्त झाले. फिर्यादी व त्यांची बहिण या विवाह झाल्यानंतर परदेशात स्थायिक झाल्या. फिर्यादी यांचे वडिल अरुण गुप्ते यांना एप्रिल २०१७ मध्ये न्युमोनिया झाला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नीला पटकन पैसा जमा करण्यात अडचणी आल्या. तेव्हा त्यांनी गुंतवणुकीमध्ये विविधता आणण्याचा निर्णय घेतला. जेणे करुन मासिक उत्पन्नाची खात्री मिळेल. त्यांनी गुंतवणुकीच्या मदतीसाठी एचडीएफसीच्या भंडारकर रोड शाखेशी संपर्क साधला. तेव्हा बँकेने आकाश सिंह याची रिलेशन मॅनेजर म्हणून नेमणूक केली. राणा याने त्यांच्या वडिलांना मुदत ठेवी व शेअर्समधील त्यांची वारसा गुंतवणुक (Investment) काढूण्यास आणि म्युच्यूअल फंड (Mutual Fund) आणि युनिट लिंक्ड विमा योजनेमध्ये (Unit Linked Insurance Scheme) पैसे हस्तातरीत करण्यास भाग पाडले.

त्यामुळे त्यांच्या वडिलांचे दीर्घ कालीन आर्थिक नुकसान झाले. कोवीड काळात लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नसल्याने राणा याने त्यांच्या
आईवडिलांच्या आर्थिक व्यवस्थापनावर पूर्णपणे ताबा मिळविण्याची संधी साधली. त्यांची जुनी गुंतवणुक बंद करण्यास भाग पाडून
म्युच्यूअल फंडावर कर्ज घेऊन ओव्हर ड्राफ्ट खाते मार्फत इक्विीटी मार्केटमध्ये (Equity Market)
पुन्हा गुंतवणुक करण्यास भाग पाडले व मोठा सट्टा लावायला सुरुवात केली.
फिर्यादी यांच्या वडिलांचे नोव्हेबर २०२२ मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांची बहिण अमेरिकेतून आली.
तिने वडिलाचे आर्थिक व्यवहाराचा तपशील पाहिल्यावर तो जुळत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर हा अपहार उघड झाला.
राणा याने त्यांच्या खात्यातील रक्कमा ज्यांच्याशी काही संबंध नाही, अश लोकांच्या नावे वर्ग केल्या.

 

ओव्हर ड्राफ्ट खात्यातून एका कंपनीत मोठी रक्कम ट्रान्सफर केली. त्यांच्या आईवडिलाचे बँक डिटेल्स व नेटबँकिंग पीन,
एटीएम पीन तसेच बँक व्यवहाराचे कामासाठी आवश्यक असल्याचे खोटे सांगून वेळोवेळी इंटरनेट बॅकिंगद्वारे व
एटीएम तसेच चेकद्वारे प्रत्यक्ष ट्रान्जेक्शन करुन व रोख रक्कमा काढून १ कोटी ६५ लाख ८१ हजार ९११ रुपये रक्कमा काढून अपहार केला.
आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी (API Vishwanath Todkari) तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Deccan Police Station – Relation Manager appointed by the bank and
he put 1 Crore 65 Lakhs; Even after the death of the engineer, money was withdrawn from his account

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Bombay High Court |  मशिदींवरच्या भोंग्यावरुन हायकोर्टानं मुंबई पोलिसांना फटकारलं, दिले ‘हे’ आदेश

Kalyan Crime News |  इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात, गुंगीचे औषध देऊन आर्मी जवानाकडून महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार

Devendra Fadnavis | ‘अंदाज कुछ अलग है मेरा, किसको…’, फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे? (व्हिडिओ)