Pune Crime News | 3 लाखांच्या कर्जाचे 4 लाख 20 हजार परत केल्यानंतरही आणखी 10 लाखांची मागणी; पैसे न दिल्यास गहाण ठेवलेली गाडी पेटवून देण्याची धमकी, दोघा सावकारांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | बांधकाम व्यावसायिकाने ३ लाख रुपये कर्ज घेऊन त्याबदल्यात ४ लाख २० हजार रुपये परत केले. दरम्यान, एक हप्ता थकला असताना सावकाराने (Money Lender In Pune) गहाण ठेवलेली चारचाकी गाडी परस्पर विकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्व पैशांची परतफेड केल्यानंतरही आणखी १० लाख रुपये दिले नाही तर जीवे मारुन टाकू गाडी पेटवून देऊ अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १८६/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी योगेश गिरी (Yogesh Giri) व योगेश काळे Yogesh Kale (दोघे रा. धनकवडी) यांच्यावर सावकारी अधिनियमानुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार ९ मे २०१९ पासून सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सिव्हील इंजिनिअर असून त्यांच्या पतीचा बांधकाम व्यवसाय आहे. पतीच्या बांधकाम व्यवसायात आर्थिक अडचण आल्याने त्यांनी योगेश गिरी व योगेश काळे यांच्याकडून ९ मे २०१९ रोजी १० टक्के व्याजाने ३ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यासाठी त्यांची इनोव्हा (Innova Car) गाडी गहाण ठेवली. त्यांनी पहिल्या महिन्याचे २७ हजार ५०० रुपये व्याज कट करुन २ लाख ४२ हजार ५०० रुपये दिले. त्यानंतर त्यांच्या पतीने पुढील दोन महिन्यांचे व्याज दिले. परंतु, तिसर्या महिन्याचे व्याज वेळेवर देता आले नाही.
तेव्हा त्यांना राणे नावाच्या व्यक्तीचा फोन आला. तुमची गाडी योगेश गिरी व योगेश काळे यांनी मला विकली आहे.
टी टी फॉर्मवरील सह्या आरटीओमध्ये जुळल्या नाहीत. तुम्ही फॉर्म दुरुस्त करुन द्या, असे त्याने सांगितले.
तेव्हा त्यांनी आम्ही गाडी विक्री केली नाही, गहाण ठेवली असल्याचे सांगितले.
त्यावर त्याने या कामासाठी खर्च झालेले ४१ हजार रुपये त्यांच्याकडून वसुल केल्यावर गाडीचे आर सी बुक दिले.
याचा जाब विचारल्यावर तुम्ही व्याजाची रक्कम वेळेत परत केली नाही तर गाडीचे सर्व पार्ट वेगवेगळे करुन विक्री करणार अशी धमकी दिली. (Pune Crime News)
त्यानंतर त्यांनी एकूण ४ लाख २० हजार रुपये परत करुन गाडीची मागणी केली.
तेव्हा त्यांनी गाडी पाहिजे असेल तर आणखी १० लाख रुपये द्यावे लागतील.
१० लाख रुपये दिले नाहीत तर तुझी गाडी पेटवून देतो आणि मारुन टाकतो, अशी धमकी दिली.
त्यावर फिर्यादीच्या पतीने तुम्हाला व्याज व सर्व मुद्दल दिली आहे, जास्त रक्कम आता देऊ शकत नाही,
असे सांगितल्यावर अशोक दुरेकर याच्या ऑफिसवर बोलावून घेऊन त्यांना मारहाण (Beating) केली.
त्यांच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक गुप्ता तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Demand for another 10 lakhs even after returning 4 lakhs 20 thousand of a loan of 3 lakhs; Threatened to set the mortgaged car on fire if the money is not paid, a case has been registered against the two moneylenders
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Sangli ACB Trap | 40 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात