Pune Crime News | सिंहगडावर पार्टीला जाण्यासाठी कोयत्याने धाक दाखवत पैशांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगड परिसरात (Sinhagad fort) पार्टीला जाण्यासाठी कोयत्याचा धाक दाखवत पैश्यांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कृष्णा छगन मरगळे (वय 19) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सागर ढेबे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Demanding money with a scythe to go to the party at Sinhagad fort
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा मरजळे व त्याचे मित्र हिंगणी खुर्द गावातील बालाजी स्वीट मार्ट दुकाना समोर बसले होते. त्यावेळी त्याठिकाणी सागर आला. त्याने फिर्यादीच्या गळ्याला कोयता लावून “मला पार्टीला पानशेत येथे जायचे आहे. तुझ्याकडील सर्व पैसे दे नाहीतर तुला मारून टाकीन असे म्हणत धमकी दिली. फिर्यादीने माझ्याकडे पैसे नाहीत, असे म्हणाल्याने आरोपीने तुला माहित आहे का मी वडगावचा भाई आहे असे म्हणून कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. तर फिर्यादी तरुणाच्या खिशातील 2 हजार 170 रुपये जबरदस्तीने काढून नेले. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Pune Crime News | Demanding money with a scythe to go to the party at Sinhagad fort

हे देखील वाचा

Pune Crime News | लष्कर परिसरात तोडफोड केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून एकाला अटक

Swargate Police Station |अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; गळा दाबून जीवे मारण्याची दिली धमकी

Union Minister Raosaheb Danve । संजय राऊतांचं रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं’

Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा नवा खुलासा; म्हणाले – ‘त्या’ दिवशी अजित पवारांचा फोन आला होता पण..