Pune Crime News | व्हिसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 5 महिलांवर विशेष शाखेकडून हद्दपारीची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अवैधरित्या पुण्यात वास्तव्य करणाऱ्या पाच परदेशी महिलांवर (Foreign Women) हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या (Pune Police Special Branch) परकीय नागरीक नोंदणी शाखेने शनिवारी (दि.11) ही कारवाई केली. या महिला टुरिस्ट व्हिसावर (Tourist Visa) भारतात आल्या होत्या व नोकरी करण्याचा वैध व्हिसा नसताना (Pune Crime News) मसाज पार्लरमध्ये नोकरी करीत होत्या.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या (Pune Police Commissionerate) हद्दीत परदेशी महिला परकिय नागरिक टुरिस्ट व्हिसावर येऊन नोकरी करत असल्याची माहिती परकिय नागरिक नोंदणी शाखेला (FRO, Pune City) मिळाली. त्यानुसार 4 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीतील एनआयबीएम रोडवरील एका खासगी मसाज पार्लरवर छापा टाकून पाच महिलांना ताब्यात घेतले. (Pune Crime News)

ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांना मुंढवा येथील शासकीय महिला सुधारगृहात
(Government Women Reformatory) निगराणीखाली ठेवण्यात आले होते.
दरम्यान, त्यांचे विमान तिकीट आरक्षित करुन शनिवारी (दि.11) या महिलांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
(Mumbai International Airport) येथून त्यांच्या मुळ देशात पाठवण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परकिय नोंदणी शाखेच्या (Foreign Citizens Registration Branch) पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | Deportation action by Special Branch against 5 women who violated visa rules

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Double Murder Case | पुण्यातील दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकललं, आईवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी UPSC करणाऱ्याने दाम्पत्याला संपवलं

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला केवळ खुर्च्यांची गर्दी’, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Ajit Pawar | आपल्याला बदला घ्यायचा आहे, पोटनिवडणूकीच्या जाहीर सभेत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी