Pune Crime News | गुगल मॅपवरुन रस्ता शोधणं बेतलं जिवावर, महामार्गावर ट्रकच्या धडकेत संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गुगल मॅपवरुन (Google Map) रस्ता शोधण्याचा प्रयत्न दुचाकीवर मागे बसलेल्या एका तरुणीच्या जीवावर बेतला आहे. सिंहगडावर (Sinhagad) दुचाकीवरुन फिरायला गेलेल्या तरुण-तरुणीने परतत असताना रस्ता शोधण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतली. मात्र गुगल मॅपने चुकीचा मार्ग दाखवल्याने ते महामार्गावर आले. रस्ता चुकल्याचे लक्षात आल्याने ते वळण घेत असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकची धडक (Pune Crime News) बसली. यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग (Mumbai-Bangalore Bypass) परिसरात झाला.

रिदा इम्तियाज मुकादम Rida Imtiaz Muqadam (वय 23, रा. खराडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे.
अपघातात दुचाकीस्वार नटराज अनिलकुमार Natraj Anilkumar (वय 30, रा. वानवडी) जखमी झाला आहे. रिदा आणि नटराज खराडी भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत (IT company) संगणक अभियंता (Computer Engineer) आहेत. ते दोघे सिंहगडावर फिरण्यासाठी गेले होते. त्यांना वानवडीला जायचे असल्याने ते गुगल मॅपवर रस्ता शोधत असताना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर आले. दुचाकी चालवत असलेल्या नटराज आणि रिदा बाह्यवळणावरुन नवीन कात्रज बोगद्याकडे (New Katraj Tunnel) गेले. आपला रस्ता चुकल्याचे नटराजच्या लक्षात आले. (Pune Crime News)

 

नवीन कात्रज बोगद्याजवळून वळण घेत असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकची धडक दुचाकीला बसली.
यामध्ये रिदाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालक न थांबता निघून गेला. याबाबत नटारज याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station) फिर्य़ाद दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात (PSI Atul Thorat) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Desperate to find the road on Google map, a young computer engineer died in a collision with a truck on the highway; Incidents in Mumbai-Bangalore Outer Ring Road area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2023 | ‘हा तर महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार..;’ केंद्रीय बजेटवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची टीका

Kolhapur Police Inspector / API Transfer | कोल्हापूर पोलीस : 18 पोलीस निरीक्षक आणि 5 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Pune By Elections | कसब्याची जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! इच्छुकांची मोठी यादी