Pune Crime News | धनकवडीत स्पेशल 26 च्या स्टाईलने घातली ‘धाड’; खोटा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवून अ‍ॅन्टी करप्शनच्या नावाने आणि न्यूज रिपोर्टर असल्याचे सांगून लुबाडले

पुणे : Pune Crime News | अ‍ॅन्टी करपशनचे पोलीस (Anti Corruption Police) आणि न्यूज रिपोर्टर (News Reporter) असल्याचे सांगून एका गटाने छापा टाकल्याचा बहाणा केला. वेश्या व्यवसाय करीत असल्याचा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवून महिलेला लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी धनकवडीतील (Dhankawadi ) एका सोसायटीत राहणार्‍या ४० वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५५/२३) दिली आहे. त्यानुसार सीमा शशिकांत शिंदे (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर), तिचा मित्र, अर्चना नायडू व चार महिला, ३ पुरुष अशा १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना धनकवडीत एका सोसायटीत १८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ ते पावणे बारा वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेच्या घरी काही जण आले. त्यांनी आम्ही अ‍ॅन्टी करपशनचे पोलीस व न्यूज रिपोर्टर असल्याचे सांगितले. फिर्यादी व फिर्यादीच्या मुलांना व भाचीला हाताने मारहाण (Beating) केली. तुम्ही येथे वेश्या व्यवसाय करीत आहे, असे खोटे सांगून तुमच्यावर केस करतो, अशी धमकी दिली. केस ताबडतोब मिटवण्यासाठी फिर्यादीकडून १४ हजार रुपये रोख व ७० हजार रुपयांचे १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ८४ हजार रुपयांचा ऐवज घेऊन गेले. (Pune Crime News)

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनीच हा छापा घातल्याचे त्यांना काही दिवस वाटत होते.
त्यांनी पोलिसांकडे चौकशी केल्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग असा छापा घालत नाही, हे त्यांनी सांगितले.
तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
हा प्रकार सुरु असताना त्यांच्या ओळखीची सिमा शिंदे ही सोसायटीच्या बाहेर उभी असल्याचे फिर्यादीच्या मुलाने पाहिले होते.
त्यावरुन पोलिसांनी केलेल्या तपासात सिमा शिंदे हिनेच आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने हा बनावट छापा
घडवून आणला असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस या सर्वांचा शोध घेत असून सहायक पोलीस निरीक्षक शेडे
तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Dhankawadi Special 26 styled raid; In the name of anti-corruption and pretending to be a news reporter, he cheated for fear of filing a false case.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhajinagar | औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’! केंद्र सरकारची मंजुरी; देवेंद्र फडणवीसांनी केलं ‘हे’ ट्विट

Pune ACB Trap | जलसंपदा विभागाचा उपविभागीय अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; ७ लाखांची लाच मागून साडेतीन लाख घेताना…