Pune Crime News | महावितरणच्या अधिकार्‍याला शिवीगाळ करत केली मारहाण; धायरीत वीज पुरवठा खंडित केल्याच्या रागातून केले कृत्य

पुणे (Pune Crime News) : घरातील वीज बिल थकल्यामुळे वीज पुरवठा खंडित केल्याच्या रागातून महावितरणच्या अधिकार्‍याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याचा प्रकार धायरीत घडला आहे.

याप्रकरणी महावितरणचे अधिकारी महेश माने (MSEDCL Officer Mahesh Mane) ( यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी रवींद्र सुधाकर चव्हाण (वय ४५, रा. समृद्धी अंगण, धायरी) यांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश माने (MSEDCL Officer Mahesh Mane) हे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून महावितरणच्या धायरी विभागात कार्यरत आहे. रवींद्र चव्हाण यांचे गेल्या १ वर्षांपासून ८८ हजार ५३० रुपयांची वीजबिलाची थकबाकी आहे.

त्यामुळे नियमानुसार त्यांच्या घराचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी ते आपल्या सहकार्‍यांसह धायरी भागात रविवारी सकाळी गेले होते. यावेळी कर्मचारी वीज पुरवठा खंडित करीत असताना चव्हाण यांनी माने यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करीत कानाखाली मारली.

तसेच जबरदस्तीने पुन्हा वीज पुरवठा सुरु करण्यास लावले. तुम्हाला बघून घेतो, अशी धमकी देत
सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime News | dhyari crime mseb engineer

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update