Pune Crime News | जादूटोण्यासाठी किळसवाणा प्रकार ! महिलेचे मासिक पाळीचे रक्त विकलं

पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जादूटोण्यासाठी (Blackmagic) महिलेचे मासिक पाळीचे रक्त (Woman’s Menstrual Cycle Blood) 50 हजारांना विकले असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी 27 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) तक्रार दिली आहे. संबंधीत महिला विश्रांतवाडी परिसरात राहायला आहे. दोन वर्षांपूर्वी तिचा प्रेम विवाह (Love Marriage) झाला आहे. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी तिला मानसिक त्रास द्यायला सुरूवात केली. तिच्या मासिक पाळी दरम्यान सासरी मंडळी तिचे हात पाय बांधून ठेवत आणि कापसाने तिचे मासिक पाळीचे रक्त घेत. हे रक्त त्यांनी जादूटोण्यासाठी तब्बल 50 हजार रूपयांना विकले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही किळसवाणा प्रकार सुरू होता. अखेर तिने याबाबत आपल्या माहेरी सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेच पोलिसात तक्रार दाखल केली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हा प्रकार बीडमध्ये (Beed Crime) घडला आहे. त्यामुळे महिलेच्या
तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पुढील तपास तिकडे करण्यात येईल. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

Web Title : Pune Crime News | Disgusting type of witchcraft! Women’s menstrual blood sold

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Budget Session | सांगलीतील ‘जात’ प्रकारावरुन विधानसभेत खडाजंगी, मविआच्या आक्रमक नेत्यांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला

Pune PMC Warje Multispeciality Hospital | वारजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल : ठेकेदारासाठी महापालिकेने कर्ज काढण्यास आमचा विरोध – खासदार सुप्रिया सुळे

MP Imtiyaz Jaleel | एमआयएमचे खासदार इम्‍तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

Nashik ACB Trap | नाशिक भूमि अभिलेखचे आणखी दोन अधिकारी आणि खासगी एजंट अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुण्यातील कुख्यात गुंड सचिन माने व त्याच्या 13 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 16 वी कारवाई