Pune Crime News | पर्स चोरीला गेल्याचा संशय? मुलाने टाकलेली पर्स पोलिसांनी काढली शोधून, जाणून घ्या नेमकं काय झालं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ऑस्टेलिया येथून आलेली महिला युनिव्हर्सल हॉस्पिटलमध्ये आली असताना तिची पर्स चोरीला गेल्याचा संशय होता. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर ही पर्स तिच्याच मुलाने हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये टाकल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी ती शोधून महिलेला साडेसात लाखांचे दागिने असलेली पर्स परत केली. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साडो उमर ही ऑस्टेलियन महिला शनिवारी सायंकाळी कसबा पेठ पोलीस चौकीत (Kasba Peth Police Chowki) आली. तिने तिची १५ तोळे सोन्याची पर्स युनिव्हर्सल हॉस्पिटलमधून चोरीला गेल्याचे सांगितले. पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद (Sr. PI Shabbir Sayyed) यांना ही बाब सांगून हॉस्पिटल व परिसरात शोध घेतला. परंतु पर्स मिळून आली नाही. (Pune Crime News)

 

तेव्हा पोलिसांनी युनिव्हर्सल हॉस्पिटलचा सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले. तेव्हा या महिलेच्या मुलाने तिची पर्स खिडकीतून खाली हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये फेकल्याचे दिसून आले. हे लक्षात आल्यावर पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर (PSI Kavita Rupnaver), राजू पवार, पोलीस हवालदार सुनील मोरे,
पोलीस शिपाई अनिल गायकवाड, राजाराम गाढवे यांनी हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये जाऊन पर्सचा शोध घेतला.
तेथे सर्वत्र पत्रा, लाकडे, माती, फावडा असा राडारोडा पडलेला होता.
सर्वांनी मोबाईलच्या टॉर्चमध्ये फावड्याने माती इकडची तिकडे करुन शोध घेतल्यावर त्यांची सोन्याचे दागिने असलेली पर्स मिळून आली.
पोलिसांनी ही पर्स महिलेला आणून दिली. तेव्हा तिने त्यातील एक सोन्याची अंगठी व कानातील रिंग कमी असल्याचे सांगितले.
पोलिसांनी पुन्हा शोधाशोध करुन अंगठी व कानातील रिंग शोधून सुमारे साडेसात लाखांचे १५ तोळे सोन्याचे दागिने या महिलेला परत केले.

 

Web Title :- Pune Crime News | Do you suspect that your wallet has been stolen? The police found the wallet left by the boy, find out what really happened

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakul Preet Singh | अभिनेत्री रकुल प्रीत सिंह निळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे एकदम झक्कास; फोटो व्हायरल

Pune News | सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे कॉँग्रेस शिष्टमंडळाला आश्वासन

Smita Gondkar | अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या हॉट आणि सेक्सी फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान