Homeक्राईम स्टोरीPune Crime News | 'टेस्ट ट्यूब बेबी' सेंटरचे लायसन्स मिळवून देण्याच्या आमिषाने...

Pune Crime News | ‘टेस्ट ट्यूब बेबी’ सेंटरचे लायसन्स मिळवून देण्याच्या आमिषाने डॉक्टरची 30 लाख रूपयांची फसवणूक

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | इथोपिया (ethiopia) देशातील टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे (test tube baby centre) लायसन्स मिळवून देण्याच्या आमिषाने दाम्पत्याने मुंबईतील एका डॉक्टरची (Mumbai Doctor) 30 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे. 2018 ते 2021 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी डॉ. केदार नागेश गणला Dr. Kedar Nagesh ganla (वय 52) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमेन्द्र सारस्वत Somendra Saraswat (वय 43) व पत्नी नेहा सारस्वत Neha Saraswat यांच्यावर खडकी पोलिस ठाण्यात (Khadki Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे माहीम येथील रहिवासी असून, डॉक्टर आहेत. त्यांचे रुग्णालय आहे. तर आरोपीने बोपोडीत एका इमारतीत ‘जिओ हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड’ jio healthcare private limited या नावाचे शॉप सुरू केले होते. या दोघांची ओळख झाल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना इथोपिया येथे दहा ते पंधरा टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहेत. त्याचे कामकाज मी पाहतो, असे सांगितले. तर इथोपिया मेडिकल गव्हर्नमेंट आणि कौन्सिल Ethiopia Medical
Government and Council येथे आपली ओळख असल्याचे भासवले. तसेच त्या देशातील
मेडिकल रजिस्ट्रेशन आणि लायसन्स मिळवून देतो, असे सांगून विश्वास संपादन केला.

त्यानंतर ते करून देण्यासाठी वेळोवेळी त्यांच्याकडून 30 लाख रुपये घेतले. मात्र पैसे देऊनही
फिर्यादीला काम करण्यासाठी इथोपिया येथे पाठवले नाही. त्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीला चेक स्वरूपात पैसे दिले. पण, चेक बाउन्स झाले. त्यानंतर त्याला
संपर्क साधला. पण त्याने देतो देतो असे म्हणून पैसे देण्यास टाळाटाळ करून त्यांची फसवणूक केली
आहे. अधिक उपनिरीक्षक तांबे हे करत आहेत.

हे देखील वाचा

Monsoon Update | राज्यात मान्सूनचे दमदार आगमन; कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अलर्ट जारी

Bhosari MIDC Land Scam Case | एकनाथ खडसेंची पत्नी मंदाकिनी यांना देखील ईडीचं समन्स, गिरीश चौधरीनंतर सासु-सासरे ‘रडार’वर?

Koregaon Bhima Inquiry Commission | कोरेगाव भीमा हिंसाचार आयोग साक्षीसाठी शरद पवार यांना बोलवणार; कोरोनामुळे ठप्प झाले होते कामकाज

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime News | Doctor cheated of Rs 30 lakh in order to get test tube baby center license

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News