Pune Crime News | दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं! टिकावाने पती-पत्नीची निर्घृण हत्या, रक्ताने माखलेला टिकाव रस्त्यावरुन घेऊन जाताना पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील दापोडी (Dapodi) परसरात दुहेरी हत्याकांडाने (Pune Double Murder Case) खळबळ उडाली आहे. आरोपी रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फरत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात (Arrest) घेतले. शंकर नारायण काटे Shankar Narayan Kate (वय-60) आणि संगिता काटे Sangita Kate (वय-55) असे हत्या करण्यात आलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. तर प्रमोद मगरुडकर Pramod Magrudkar (वय-47) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) गुन्हा दाखल (Pune Crime News) केला आहे.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दापोडीत बेसावध असलेल्या दाम्पत्यावर आरोपीने जमीन खोदण्याच्या टीकावाने घाव घालून हत्या केली. काटे दाम्पत्य घरात बसले असताना आरोपीने त्यांच्यावर घाव घातले. ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत आरोपी स्वत:ही जखमी झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत हातात टिकाव घेऊन तो रस्त्याने फिरताना नागरिकांना दिसला. (Pune Crime News)

नागरिकांनी त्याला पकडले. नागरिकांनी याची माहिती भोसरी पोलिसांना दिली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
त्याने दोघांचा खून का केला? याचा तपास भोसरी पोलीस करत आहेत.
आरोपी प्रमोद हा नुकताच दिल्लीवरुन आला होता.

 

 

Advt.

Web Title :- Pune Crime News | double murder case police arrested accused in bhosari police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा