पुणे : Pune Crime News | इंदोरहून मुलीला भेटण्यासाठी मध्य प्रदेशचे माजी उपसचिव चालकाला घेऊन आले होते. पुण्यात आल्यावर चालक त्यांची कीया सेल्टॉस गाडी घेऊन पसार झाला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी अनिलकुमार जुनिलाल खरे (वय ६१, रा. इंदोर, मध्यप्रदेश) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चालक पारस (वय ३५, रा. मुसाखेडी, इंदोर, मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
याबाबतची माहिती अशी, फिर्यादी खरे हे मध्य प्रदेशमध्ये उपसचिव म्हणून सेवानिवृत्त झाले असून त्यांचे पुण्यात औंध येथे घर आहे. त्यांची मुलगी पुण्यात नोकरी करते. तिला भेटण्यासाठी ते २४ जानेवारी रोजी इंदोरहून कीया सेल्टॉस गाडी घेऊन निघाले. गाडीवर चालक पारस होता. ते नाशिक येथे मुक्काम करुन कल्याणलाला नातेवाईकांच्या लग्नाला हजर राहिले. नंतर २६ जानेवारी रोजी पुण्यात आले. सायंकाळी त्यांना फिरायला जायचे होते. तेव्हा त्यांनी पारसची चौकशी केली. तेव्हा तो गाडी घेऊन निघून गेल्याचे समजले. त्यांनी पारसला फोन केला. त्याने तो उचलला नाही. त्यानंतर रात्री १० वाजता त्याचा फोन आला. माझी तब्येत ठीक नसून ऑनलाइनवर पैसे पाठवा. मी जेवण करुन सकाळी येतो, असे सांगितले. त्यावर त्यांनी त्याला गाडी घेऊन घरी ये, तुला पैसे देतो, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी वारंवार फोन केला. तो बंद येत होता. त्यानंतर त्यांनी आता पोलिसांकडे धाव घेतली आहे.
Web Title :- Pune Crime News | Driver from Madhya Pradesh passed away with
Kia Seltos car; Retired Deputy Secretary was beaten up by the driver
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime News | एकुलता एक मुलगा गमावला, विजेचा शॉक बसून कोथरुड परिसरातील तरुणाचा मृत्यू
- Maharashtra Politics | नागपुरात शिवसेनेच्या ठाकरे गटावर ओढावली विभागीय कार्यालय रिकामे करण्याची नामुष्की?; जाणून घ्या नेमके कारण…
- Gold-Silver Rate | आठवड्यात सोने महागले तर चांदीचे भाव घटले, सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता