पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | बॅरिकेट लावून नाकाबंदी (Pune Police Nakabandi) करुन वाहनांची तपासणी करीत असताना स्पोर्टस बाईकवरुन आलेल्या तरुणाने बॅरिकेटला धडक देऊन तपासणी करणार्या पोलिसांना जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये दोन पोलीस, कारचालक व स्पोर्टस बाईकवरील तरुणी जखमी झाले आहेत.
ही घटना सोलापूर रोडवरील (Pune Solapur Road) महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या गेटसमोर मांजरी नाका येथे रविवारी पहाटे ५ वाजता घडली. पोलीस अंमलदार संकेत नरेश गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के, कारचालक चेतन सिंग आणि स्पोर्टस बाईकवरील सायली टिंगे अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत मनोहर भाऊ ओंबासे (वय ३९, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्पोर्टस बाईकचालक कार्तिक ढवळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी नाका येथे बॅरिकेट लावून नाकाबंदी सुरु होती. पोलीस एका कारची तपासणी करत होते. त्यावेळी लोणी काळभोर टोल नाका येथून स्पोर्टस बाईकवर कार्तिक ढवळे हा वेगाने आला. त्याने नाकाबंदीसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेटला धडक दिली. पोलीस पथकात काम करत असलेले संकेत नरेश गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के यांना तसेच ज्यांच्या कारची तपासणी केली जात होती, ते चेतन सिंग यांना जोरात धडक दिली. त्यात स्पोर्टस बाईकवरील तरुणी सायली टिंगे हिला खाली पडून गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तो तेथून पळून गेला असून सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.