Pune Crime News | पार्सलमध्ये ड्रग्ज सापडलंय! कारवाईची भीती दाखवत मुंबई क्राईम ब्रँचच्‍या नावाने दोघांकडून 31 लाख उकळले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सायबर चोर फसवणुकीची नवनवीन पद्धती शोधत असतात. पार्सलमध्ये अमली पदार्थ (Drugs) सापडले असल्याचे सांगून गुन्ह्यामध्ये अडकविण्याची भीती दाखवत आर्थिक लूट केली जात आहे. पुण्यातील येरवडा व सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या दोघांना अशाच प्रकारे भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक (Cheating Fraud Case) असल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) धाव घेतली आहे. सायबर चोरट्यांनी दोघांकडून 31 लाख रुपये उकळले. (Pune Crime News)

वडगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना 8216530636 या मोबाईल धारकाने संपर्क साधला. त्याने हर्षवर्धन बोलत असून मुंबई सायबर क्राईम ब्रँचमध्ये (Mumbai Cyber Crime Branch) अधिकारी असल्याचे सांगितले. तुम्ही मुंबई येथून तैवान येथे पाठविलेल्या पार्सलमध्ये एक्सपायर पासपोर्ट, एसबीआय क्रेडिट कार्ड व 450 ग्रॅम ड्रग्ज सापडले असू तुम्ही पाठवलेले पार्सल परत आल्याचे सांगितले. यावर फिर्यादी यांनी आपण कोणतेही पार्सल तैवानला पाठविले नसल्याचे सांगितले. (Pune Crime News)

त्यावर आपल्या नावानेच बुकिंग करण्यात आली असल्याचे सायबर चोरट्याने (Cyber Thieves) सांगितले. तसेच तुमचे बँक खाते व्हेरिफाय करायचे असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर सायबर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून 27 लाख 98 हजार 776 रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायबर पोलिसांनी हा गुन्हा सिंहगड रोड पोलिसांकडे वर्ग केला आहे. सिंहगड पोलिसांनी मोबाईल धारकावर आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2023 मध्ये फिर्याद यांच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर (PI Jayant Rajurkar) करीत आहेत.

येरवडा येथील तरुणाची सव्वातीन लाखांची फसवणूक

अशाच प्रकारे सायबर चोरट्यांनी वडगाव शेरी येथे राहणाऱ्या 34 वर्षीय व्यक्तीची सव्वा तीन लाखांची फसवणूक केली आहे. याबाबत त्याने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 9438016875 मोबाईल धारक, स्काईप आयडी धारक व आयसीआयसीआय बँक खाते धारकावर आयपीसी 420 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2023 मध्ये फिर्यादी यांच्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.

मोबाईल धारकाने फिर्यादी यांना फोन करुन मुंबई येथील फेडेक्स कंपनी मधून जयदिप राजपुत व मुंबई क्राईम ब्रँच
ऑफिसर नरेश गुप्ता बॅनर्जी बोलत असल्याचे सांगितले. त्याने खोटे कागदपत्रे पाठवून मुंबई पोलीस दलातील
(Mumbai Police) क्राईम ब्रँचमध्ये काम करत असल्याचे भासवले. तसेच मुंबई पोलिसांचे ओळखपत्र पाठवले.
तुमच्या नावाने मुंबई येथून थायलंडला पर्लस पाठवण्यात आल्याचे खोटे सांगून अटक करण्याची भीती दाखवली.
तसेच केस क्लिअर करण्यासाठी व एनओसी सर्टिफिकेट देण्याचे सांगून फिर्यादी यांना 3 लाख 26 हजार रुपये बँक
खात्यात जमा करण्यास सांगितले. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्य़ादी यांनी पुणे सायबर पोलीस
ठाण्यात तक्रार दिली. सायबर पोलिसांनी हा गुन्हा येरवडा पोलिसांकडे वर्ग केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे गायकवाड (PI Gaikwad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | नगर रोडवरील बीआरटी मार्ग अखेर इतिहासजमा; वाहतूकीला अडथळा होत असल्याने महापालिकेने काढून टाकला बीआरटी मार्ग

लग्नाचे आमिष दाखवुन तरुणीवर बलात्कार, लोणी काळभोर परिसरातील घटना

घरात घुसून महिलेसोबत गैरवर्तन, कात्रज परिसरातील घटना