Pune Crime News | पुण्यातील रास्ता पेठेतुन 11 लाखाचे अंमली पदार्थ (MD Drugs) जप्त, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-2 ची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune Crime News | पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक-2 ने रास्ता पेठेतुन एका अटक केली असून त्याच्याकडील 10 लाख 86 हजार 200 रूपये किंमतीचे एम.डी. (MD Drugs) जप्त करण्यात आले आहे. (Pune Crime News)

 

गोविंद भिवा मोरे Govind Bhiwa More (22, रा. आंबेडकर नगर, गल्ली नं. 15, मार्केट यार्ड,पुणे – Ambedkar Nagar Market Yard Pune) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बुधवारी पोलिस निरीक्षक सुनील थोपटे (PI Sunil Thopte), पोलिस उपनिरीक्षक एस.डी. नरके (PSI S.D. Narke) हे पोलिस पथकासह समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार रवींद्र रोकडे (Police Ravindra Rokde) आणि पोलिस संदीप शेळके (Police Sandeep Shelke) यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचुन त्याला अटक केली. त्याच्याकडील झडतीमध्ये 10 लाख 86 हजार 200 रूपयाचे एम.डी. आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. त्याच्याविरूध्द समर्थ पोलिस स्टेशनमध्ये (Samarth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल थोपटे,
पोलिस उपनिरीक्षक एस.डी. नरके, पोलिस अंमलदार रवींद्र रोकडे, पोलिस संदीप शेळके, पोलिस संतोष देशपांडे (Police Santosh Deshpande),
पोलिस योगेश मांढरे (Police Mandhare), पोलिस दिनेश बास्तेवाड (Police Dinesh Bastewad),
संदीप जाधव (Police Sandeep Jadhav) आणि पोलिस साहिल शेख (Police Sahil Shaikh) यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Web Title :  Pune Crime News | Drugs worth 11 lakhs (MD Drugs) seized from Rasta Pethe in Pune,
action taken by Anti-Narcotics Squad-2 of Crime Branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा