Pune Crime News | कोंढव्यात 46 लाखांचे अमली पदार्थ जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोंढवा परिसरात (Kondhwa) अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना शहर पोलिस दलाच्या (Pune City Police) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अमली पदार्थ विरोधी पथक 1 आणि पथक 2 ने (Anti Narcotic Cell Pune) वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून एकुण 46 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अमली पदार्थांमध्ये ब्राऊन शुगर आणि येमेनमधील कॅथा इडुलिस खत या अमली पदार्थांचा समावेश आहे. (Pune Crime News)

 

अमली पदार्थ विरोधी पथकाकडून गस्त घालण्यात येत होती. त्या वेळी कोंढवा परिसरात शाहिद अख्तरहुसेन शेख (वय 45, रा. इनामनगर, कोंढवा बुद्रुक) गल्ली क्रमांक १५ परिसरात थांबला होता. पाेलिसांच्या पथकाने सापळा लावून शेखला पकडले. त्याच्या पिशवीत ब्राऊन शुगर सापडली. ब्राऊन शुगरची किंमत ४० लाख ४४ हजार ८०० रुपये आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे (पथक 2) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे (PI Sunil Thopte), उपनिरीक्षक शुभांगी नरके (PSI Shubhangi Narke), शिवाजी घुले, चेतन गायकवाड, संतोष देशपांडे, संदीप जाधव, दिशा खेवलकर, योगेश मांढरे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड आदींनी ही कारवाई केली. (Pune Crime News)

 

येमेनमधील अमली पदार्थ कॅथा इडुलिस खत आणि परदेशी बनावटीच्या सिगारेटची विक्री करणाऱ्या एकास अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.
त्याच्याकडून कॅथा इडुलिस खत आणि परदेशी बनावटीच्या सिगारेट असा 5 लाख 56 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लक्ष्मण पोलाराम सिरवी (वय 34, रा. मनीष पार्क, कोंढवा, मूळ रा. सतलाना, जोधपूर, जि. राजस्थान) याला अटक करण्यात आली.
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार (ACP Sunil Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे (पथक एक) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (PI Vinayak Gaikwad), सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे,
शैलजा जानकर, पोलीस विशाल शिंदे, मनोज साळुंके, सुजीत वाडेकर, पाडुंरंग पवार, राहुल जोशी, विशाल दळवी यांनी ही कारवाई केली.

 

Web Title :- Pune Crime News | Drugs worth Rs 46 lakh seized in Kondhavi

 

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nikita Takle-Khadsare | लोणावळाच्या ऑटो क्रॉस मध्ये फास्टर ड्रायव्हरसह 9 ट्रॉफी पटकविल्या; निकिता टकले खडसरेचे यश

Pune News | कै. पं. कुमार गंधर्व जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ दि. ८ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम – मोहन जोशी

Maharashtra Politics News | ‘हेच फडणवीस तेव्हा ‘फूल’ होते, आता ‘फडतूस’ झाले’, मनसे नेत्याचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र