Pune Crime News | कौटुंबिक वादातून सासु – सासर्‍यांनी जावयाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले, चंदननगर- खराडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पती -पत्नीतील वादामुळे ते वेगळे रहात असून त्या कारणावरुन सासु सासर्‍यांनी जावयाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या घटनेत जावई गंभीर भाजला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत लखन बाजीराव काळे Lakhan Bajirao Kale (वय ३२, रा. शिरुर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४७८/२२) दिली आहे. ही घटना खराडीमधील रिलायन्स मॉलकडून (Reliance Mall, Kharadi) खराडी गावाकडे जाणार्‍या रोडवर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडली. चंदननगर पोलिसांनी सासरे रजित ऊर्फ गेंड्या याजिंदर भोसले (Rajit alias Gendya Yajinder Bhosale), सासु बासुंदी रंजित ऊर्फ गेंड्या भोसले (Basundi Ranjit alias Gendya Bhosale), साडु अलताफ विजय काळे, पत्नी पेडम लखन काळे, मेहुणा कावकर रंजित ऊर्फ गेंड्या भोसले (सर्व रा. झेन्सार कंपनीसमोर, खराडी) यांच्यावर खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन काळे व त्याची पत्नी पेडम यांच्यात कौटुंबिक वाद आहे. त्यामुळे त्याची पत्नी, मुलगा व मुलगी हे फिर्यादी सोबत रहात नाही. त्यावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. शुक्रवारी सायंकाळी लखन हे झाडाखाली बसले असताना त्याचे सासु सासरे व इतर तेथे आले.
पत्नीस नांदवित नसल्याच्या कारणावरुन त्यांनी लखन यांना मारहाण केली.
सासु सासरे यांनी प्लॅस्टिकच्या बाटलीमधील पेट्रोल लखन यांच्या अंगावर टाकली.
सासुने काडी पेटवून त्यांच्या अंगावर टाकून पेटवून दिले.
त्यात लखन यांचे पोट, पाठ, गळा, छाती व दोन्ही हात भाजले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक जानकर अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Due to a family dispute, mother-in-law poured petrol on son-in-law’s body and set it on fire, incident in Chandannagar-Kharadi area.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा