Pune Crime News | हडपसर ते स्वारगेट प्रवासादरम्यान महिलेकडील दीड लाख लांबविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर (Hadapsar) ते स्वारगेट (Swargate) पीएमपी प्रवासात एका महिलेजवळील तबल दीड लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान प्रवासात होत असलेल्या चोऱ्या थांबत नसल्याचे दिसत आहे.
Pune Crime News | During the journey from Hadapsar to Swargate, the woman lost Rs 1.5 lakh
याप्रकरणी 53 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस (Swargate Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मूळच्या शिरूर तालुक्यातील न्हावरे गावच्या आहेत. त्यांचे गावात दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी त्या खरेदी करण्यासाठी पुण्यात आल्या होत्या.

त्या हडपसर परिसरातून पीएमपी बसमध्ये बसल्या आणि स्वारगेट परिसरात उतरल्या. यादरम्यानच्या प्रवासात चोरट्याने त्यांच्याकडील पिशवीची चेन उघडून दीड लाखांची रोकड चोरली. स्वारगेट येथे आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. यानंतर त्यांनी त्यांच्या पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास उपनिरीक्षक अविनाश लोहोटे करत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Pune Hadapsar Crime News | During the journey from Hadapsar to Swargate, the woman lost Rs 1.5 lakh

हे देखील वाचा

Pan Card and Aadhaar Card | 30 जूनपूर्वी ‘हे’ काम करणे अनिवार्य अन्यथा बसेल 1 हजाराचा फटका

Ajit Pawar | ‘…तर पुणे, जिल्ह्यातून बाहेर गेलेल्यांना परतल्यास 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल’ – उपमुख्यमंत्री (व्हिडीओ)

pune commissioner amitabh gupta | पुण्यात जबरी चोर्‍या करणार्‍यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Ajit Pawar । …तर पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; उपमुख्यमंत्री अजित पवार