Pune Crime News | लग्न झाले असतानाही लग्नाचे आमिष दाखवून केला लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लग्न झाले असतानाही हिंदू नाव सांगून तरुणीवर लैगिक अत्याचार करुन मारुन टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी भंडारा जिल्ह्यातील एका ३० वर्षाच्या तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५०/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी फिरोज सय्यद मुजावर ऊर्फ अभिजित पाटील (वय ३७, रा. पुण्याई बॉईज हॉस्टेल, धनकवडी) याच्याविरुद्ध बलात्कार तसेच अनुसूचित जाती आणि अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिरोज याने फिर्यादीला त्याचे नाव अभिजित पाटील असल्याचे सांगितले. त्याचे लग्न झालेले असताना फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून जानेवारी २०२० पासून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंभोग केला.
त्याची तू जर माझी पोलिसांना तक्रार दिली तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही.
तुला मारुन टाकून मी पण मरेन.
तू पैशांसाठी माझे मागे लागली आहे, अशी खोटी तक्रार कोर्टात करेल,
असे धमकावून फिर्यादीची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक इंगोले तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Even when married, sexually assaulted by showing the lure of marriage

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा