Pune Crime News | खळबळजनक! पुण्यातील महिलेचे अपहरण करुन परराज्यात विकण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पशुखाद्य घेऊन जात असताना विमानतळ रस्त्यावरील संजय पार्क येथून एका महिलेचे अपहरण (Kidnapping Case) करुन तिला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर महिलेला एका खोलीत डांबून ठेवत गुजरातच्या गोध्रा येथे नेऊन विकण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरोपींच्या तावडीतून कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेऊन तेथून पळ काढला. त्यानंतर महिलेने गुजरात पोलिसांच्या मदतीने पुणे गाठले. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार 5 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime News)

याबाबत येरवडा येथे राहणाऱ्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कमला नावाच्या महिलेसह इतर पाच जणांवर आयपीसी 143, 149, 343, 346, 363, 366, 370 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला 5 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास टिंगरे नगर येथून पशुखाद्य घेऊन दुचाकीवरून जात होती. जेलरोड चौकीकडे जाणाऱ्या विमानतळ रस्त्यावर असलेल्या संजय पार्क जवळून येत असताना एक रिक्षा भरधाव वेगात आली आणि त्यांची दुचाकी एका बाजूला दाबली. महिलेने त्यांची दुचाकी थांबवताच रिक्षा चालक खाली उतरला. त्याचवेळी एक पांढऱ्या रंगाची कार त्यांच्या बाजूला येऊन थांबली. त्यामधून दोन जण उतरले. त्यांनी फिर्यादी यांना जबरदस्तीने गाडीत बसवले आणि तोंडाला रुमाल बांधून फिर्यादी यांना घेऊन गेले.

त्यानंतर आरोपी यांनी महिलेला इंजेक्शन दिले. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. त्यानंतर त्यांना एका खोलीत डांबून ठेवले. त्याठिकाणी असलेल्या कमलाबाई नावाच्या महिलेने ‘तेरे को भी ऐसाच रहना होगा, दुसरी जग तेरा सौदा करने वाले है’ असे म्हणत इतर आरोपींना ‘इसको संभाल के ले जाना’ असे सांगितले. आरोपींनी फिर्यादी महिलेचे हातपाय बांधून दुसऱ्या काळ्या रंगाच्या गाडीत बसून घेऊन गेले. दरम्यान, पुण्यामध्ये महिला बेपत्ता झाल्याची तक्रात पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. (Pune Crime News)

महिलेला घेऊन जाणारे आरोपी महामार्गावर आल्यानंतर महिलेने वॉशरुमसाठी जायचे असल्याचा बहाणा केला.
त्यावेळी आरोपींनी त्यांचे बांधलेले हात पाय सोडले.
वॉशरूमला जाण्याच्या बहाण्याने महिला गाडीतून खाली उतरली आणि जवळच्या जंगलात पळून जात लपून बसली.
आरोपींनी महिलेचा शोध घेतला मात्र ती सापडली नसल्याने ते निघून गेले.
काहीवेळाने महिला रस्त्यावर आली आणि स्थानिक लोकांना तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.
स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
त्यावेळी आपण गुजरात राज्यातील गोध्रा या ठिकाणी असल्याचे महिलेला समजले.

स्थानिक पोलिसांनी पीडित महिलेला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ती गुजरात पोलिसांच्या मदतीने पुण्यात आली.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन हा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रविराज वारंगुळे (API Raviraj Warangule) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : ऑनलाईन मैत्री पडली महागात, अल्पवयीन मुलीचे ‘ते’ फोटो केले व्हायरल