Pune Crime News | पुण्यात आचार्‍याकडून धक्कादायक प्रकार उघडकीस, डबे पोहोचण्याबरोबरच केल्या घरफोड्या, तब्बल 15 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खानावळीत जेवण बनविण्याचे आणि डबे पोहोचविण्याचे काम करणाऱ्या एका आचाराकडून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कामाच्या आडून विविध परिसरातील बंद घराची रेकी करून त्याची माहिती आपल्या साथिदारानां देत असे. त्यानंतर ते घरफोडी (Burglary) करत होते. अशा आचाऱ्याला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून शहरातील तब्बल 13 घरफोड्या Burglary, 1 वाहनचोरी, 1 जबरी चोरी असे एकूण 15 गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच त्याच्याकडून सोने- चांदीचे दागिने, दुचाकी, 2 टीव्ही अन् 46 हजाराची रोकड असा एकूण 6 लाख 70 हजाराचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

आकाश अशोक उमाप (रा. वानवडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना हडपसर येथील जबरी चोरीचा गुन्हा एका आचार्‍याने केल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी वानवडीत सापळा रचून आरोपी उमापला पकडले.
पकडल्यानंतर त्याने आपण आचारी असून लोकांना डबे पुरविण्याचे काम करतो.
तुम्हाला माझ्याबाबत मिळालेली माहिती चुकीची असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
पण पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने कबुली दिली.
उमाप हा वानवडीतील एका मेसमध्ये जेवण बनविण्याचे व डबे पोहोचविण्याचे काम करत आहे.
कामाच्या आडून तो असे काम करत असत. सराईत गुन्हेगार जयसिंग कालुसिंग जुन्नी ऊर्फ पिलु, सोमनाथ ऊर्फ सोम्या गारुळे (दोघे रा. बिराजदारनगर, हडपसर) यांच्या सोबत त्याने घरफोडी Burglary, जबरी चोरी, वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले.

Pune Crime News | पुण्याच्या बिबवेवाडी परिसरातील हळंदे टोळीवर मोक्का

स्पर्मपेक्षा कितीतरी पट जास्त किमती, जाणून घ्या – महिलांच्या एग्ज बाबत ‘या’ 8 रंजक गोष्टी

Kolhapur News | खळबळजनक ! कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रसिध्द चांदी व्यापाऱ्याची स्वतःच्या डोक्यात गोळी झाडुन आत्महत्या

Wab Title : pune crime news exciting incident pune burglar was working cook restaurant